शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मायलेकींना तलवारीने मारायला गेलेल्या आरोपीवर सहा गुन्हे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:27 IST

गोंदिया : मी केलेला प्रपोज नाकारला म्हणून गोंदियातील अल्पवयीन मुलीला व तिच्या आईला तलवारीने मारायला गेलेल्या तरुणाची तलवार गोंदिया ...

गोंदिया : मी केलेला प्रपोज नाकारला म्हणून गोंदियातील अल्पवयीन मुलीला व तिच्या आईला तलवारीने मारायला गेलेल्या तरुणाची तलवार गोंदिया शहर पोलिसांनी जप्त केली. आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्या आरोपीची तुरुंगात रवानगी केली आहे.

मुकेश विनोद तांडेकर (३०, रा. गौतमनगर बाजपाई वॉर्ड गोंदिया असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी मुकेश विनोद तांडेकर (३०) याने एका १६ वर्षांच्या मुलीला प्रपोज केले. तिच्याशी प्रेमसंबंध ठेवण्यासाठी त्याने १० ऑगस्ट २०१९ पासून ३० जुलै २०२१ या काळात तिचा वारंवार पाठलाग केला; परंतु त्याच्या प्रेमाला त्या मुलीने नकार दिल्यामुळे आरोपी ३० जुलै रोजी तिच्या घरी तलवार घेऊन गेला. तिला व तिच्या आईला तलवारीने ठार करण्याची धमकी दिली. यासंदर्भात आरोपीविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३५४ (अ), ३५४ (ड), ४५२, ५०९, ५०४, ५०६ सहकलम १२ बाललैंगिक अत्याचार अधिनियम कलम ४, २५ भारतीय हत्यार कायदा कलम १३५ महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. आरोपी हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याने त्याच्यावर यापूर्वी गोंदिया शहर पोलिसांत विविध प्रकारचे सहा गुन्हे दाखल आहेत. त्याच्याविरुद्ध गोंदिया शहर पोलीस ठाण्यात सन २०११ मध्ये मारामारीच्या कलम ३२४ अंतर्गत, जुगाराचा गुन्हा दाखल आहे. सन २०१२ मध्ये अल्पवयीन मुलीच्या अपहरण प्रकरणात कलम ३६३ अंतर्गत, सन २०१४ मध्ये बलात्काराचा गुन्हा, २०१५ मध्ये चोरीचा गुन्हा तर २०२० मध्ये जुगाराचा तर आता विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याचे ठाणेदार महेश बनसोडे यांनी सांगितले आहे. या प्रकरणाचा तपास साहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव सीद करीत आहेत.