शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील कुपोषणावर बसणार आळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2018 23:26 IST

कुपोषणाच्या समस्येने त्रस्त आदिवासी व नक्षलग्रस्त गोंदिया जिल्ह्याची सुटका होणार आहे. अंगणवाडीत आतापर्यंत स्प्रींग बॅलेंस वजन काट्याचा उपयोग केला जात होता. या वजन काट्यातील चुकांमुळे कुपोषित बालकांचा मृत्यू होत होती.

ठळक मुद्देपहिल्या टप्यात ३० जिल्ह्यांची निवड : विभागातील पाच जिल्ह्यांचा समावेश

नरेश रहिले ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कुपोषणाच्या समस्येने त्रस्त आदिवासी व नक्षलग्रस्त गोंदिया जिल्ह्याची सुटका होणार आहे. अंगणवाडीत आतापर्यंत स्प्रींग बॅलेंस वजन काट्याचा उपयोग केला जात होता. या वजन काट्यातील चुकांमुळे कुपोषित बालकांचा मृत्यू होत होती. कुपोषणामुळे होणाऱ्या बालमृत्यूवर आळा घालण्यासाठी सरकारने ३० जिल्ह्यात वजन मापक डिजिटल यंत्रे उपलब्ध करुन दिली जाणार आहे.अंगणवाडी मधील स्प्रींग बॅलेंस काटे व डिजिटल वजन मशीन यांच्यामार्फत वजन मोजल्यास दोन्ही काट्यांमध्ये १५० ते २०० ग्रॅम वजनाचा फरक पडत असल्याचा तक्रारी आहेत. आता राज्य सरकारने अंगणवाडीतील बालकांचे खरे वजन मोजण्यासाठी डिजिटल वजन मापक यंत्र देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.केंद्र सरकारकडून पोषण अभियानांतर्गत देशाच्या प्रत्येक राज्यात टप्याटप्याने अमंलबजावणी करण्यात येणार आहे. पहिल्या टप्यात २०१७-१८ व २०१८-१९ मध्ये महाराष्टÑातील ३० जिल्ह्यांचा पोषण अभियानात समावेश करण्यात आला. राज्यातील ४४४ प्रकल्पांची ८५ हजार ४५२ अंगणवाड्यांचा समावेश आहे.राज्यात पहिल्या टप्यात ३० जिल्ह्यांचा समोवश केला आहे. यात नागपूर विभागातील चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा नागपूर व गोंदिया जिल्ह्याचा समावेश आहे. राज्य सरकारतर्फे ३० जिल्ह्यातील अंगणवाड्यांसाठी प्रत्येक एक असे उंची मापक यंत्र, बालके मापक यंत्र, माता व बालकांचे मापक यंत्र खरेदी करण्यासाठी ३४ कोटी १० लाख ८३ हजार ३८७ रूपये मंजूर करण्यात आले आहे.पोषण अभियानासाठी केंद्र व राज्य निधीची टक्केवारी ८०.२० टक्के राहील.नागपूर विभागातील १२ हजार १६४ अंगणवाड्यांना पहिल्या टप्यात यंत्र दिले जाणार आहेत. नागपूर विभागात सुधारीत अंगणवाड्यांची संख्या १३ हजार ६९९ आहे. यापैकी पहिल्या टप्यात नागपूर, चंद्रपुर, गडचिरोली, वर्धा व गोंदिया जिल्ह्याच्या ५० प्रकल्प कार्यालयांतर्गत येणाºया १२ हजार १६४ अंगणवाड्यांचा समावेश आहे.या सर्व अंगणवाड्यांना वजन मापक यंत्र दिले जाणार आहेत.जिल्ह्यातील १० प्रकल्प कार्यालयांतर्गत १८१९ अंगणवाड्यांचा समावेश आहे.