शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

साहेब, आम्हाला पायाभूत सुविधा केव्हा मिळणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:24 IST

राजेश मुन्नीश्वर सडक अर्जुनी : शासन आणि प्रशासन एकीकडे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाच्या गोष्टी करीत असताना दुसरीकडे मात्र जिल्ह्यातच दिव्याखाली ...

राजेश मुन्नीश्वर

सडक अर्जुनी : शासन आणि प्रशासन एकीकडे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाच्या गोष्टी करीत असताना दुसरीकडे मात्र जिल्ह्यातच दिव्याखाली अंधार असल्याचे चित्र आहे. तालुक्यातील मुशानझोरवा गावातील नागरिक अद्यापही पायाभूत सुविधांपासून वंचित आहेत. धड रस्ते नाहीत. पायभूत सुविधा नसल्याने येथील गावकऱ्यांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. येथील गावकऱ्यांच्या समस्यांची शासन आणि प्रशासनाने दखल घेतली नसल्याने येथील गावकरी साहेब, आम्हाला पायाभूत सुविधा केव्हा मिळणार, असा सवाल करीत आहेत.

‘गाव तिथे रस्ता’, ‘गाव तिथे शाळा’ हा शासनाचा नारा असला तरी यापासून मात्र मुशानझोरवावासीय अद्यापही वंचित आहेत. सडक अर्जुनी पंचायत समितीअंतर्गत खडकी गट ग्रामपंचायतीत येणाऱ्या मुशानझोरवा गावात अद्यापही पक्के रस्ते नाहीत. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांत गावकऱ्यांना चिखलातूनच मार्ग काढावा लागतो. हे गाव जंगलव्याप्त असल्याने पक्क्या रस्त्यांअभावी गावकऱ्यांना तीन कि.मी.चे अंतर चिखलातून पार करावे लागते. या परिसरात नेहमीच वन्यप्राण्यांचा वावर असतो. त्यामुळे गावकऱ्यांना जीव मुठीत धरून पायवाट शोधावी लागते. या गावात अद्यापही अंगणवाडी केंद्र सुरू करण्यात आले नाही. त्यामुळे चिमुकले अंगणवाडीत जाण्यापासून वंचित आहेत. हे गाव जंगलव्याप्त असल्याने आरोग्य विभागाचे कर्मचारीही या गावाला भेट देत नसल्याने गावकऱ्यांना आरोग्यविषयक सोयीसुविधांपासून दूर राहावे लागत आहे. गावात पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत गावकऱ्यांनी अनेकदा पाठपुरावा केला. मात्र, त्याची शासन आणि प्रशासनाने दखल घेतली नाही.

............

शेती आणि पशुपालनावर उदरनिर्वाह

मुशानझोरवा गावातील नागरिकांचा मुख्य व्यवसाय हा शेतीच असून, शेतीला जोडधंदा म्हणून गावकरी पशुपालन व दुग्ध व्यवसाय करतात. यावरच येथील गावकऱ्यांचा उदरनिर्वाह चालतो. शासनाने येथील गावकऱ्यांना अर्थसाहाय्य उपलब्ध करून दिल्यास गावकऱ्यांचा विकास होऊ शकतो.

...........

विद्यार्थ्यांची पायपीट

मुशानझोरवा येथे चौथीपर्यंतच शाळा असल्याने पुढील शिक्षणासाठी येथील विद्यार्थ्यांना देवरी, गोंदिया, साकोली, नागपूर येथे जावे लागते. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने गावात दहावीपर्यंत शाळा सुरू केल्यास विद्यार्थ्यांना मदत होऊन त्यांना करावी लागणारी पायपीट थांबू शकते.

................

पिण्याच्या पाण्याची समस्या मार्गी

मुशानझोरवा येथील पिण्याच्या पाण्याची समस्या अलीकडेच मार्गी लावण्यात आली. सौर ऊर्जेवर चालणारे पंप बसविण्यात आले. त्यामुळे येथील गावकऱ्यांची समस्या मार्गी लागली आहे. मात्र, इतर समस्या कायम आहेत.