शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

साहेब काही करा, पण एक रेमडेसिविर इंजेक्शन मिळवून द्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:28 IST

गोंदिया : साहेब माझी आई रुग्णालयात दाखल आहे, डॉक्टर म्हणतात रेमडेसिविर इंजेक्शन लावावे लागेल, सायंकाळपर्यंत किमान एकतरी रेमडेसिविर इंजेक्शन ...

गोंदिया : साहेब माझी आई रुग्णालयात दाखल आहे, डॉक्टर म्हणतात रेमडेसिविर इंजेक्शन लावावे लागेल, सायंकाळपर्यंत किमान एकतरी रेमडेसिविर इंजेक्शन आणून द्या, असे सांगितले आहे. मेडिकलमध्ये इंजेक्शन घेण्यासाठी गेलो, पण ते म्हणतात स्टॉक नाही, जिल्हाधिकारी कार्यालयाकडून वितरण झाल्यानंतर ते उपलब्ध होईल, असे सांगतात. मात्र आईची प्रकृती खालावत आहे, तिला किमान एक तरी रेमडेसिविर इंजेक्शन मिळवून द्या साहेब, अशी विनवणी करणारे फोन शनिवार दिवसभर येत होते. अशी बिकट स्थिती सध्या जिल्ह्यात निर्माण झाली आहे.

मागील आठवडाभरापासून जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढत आहे. आठ दिवसांत ८३८५ बाधितांची नोंद झाली आहे, तर सात दिवसांत ११७ बाधितांचा मृत्यू झाला आहे. रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने शासकीय रुग्णालयासह खासगी रुग्णालयातील बेड सुद्धा हाऊसफुल्ल झाले असून, काही रुग्णालयात तर वेटिंग आहे. रुग्णांना दाखल करण्यासाठी लोकप्रतिनिधी, नगरसेवक, पत्रकार या सर्वांनाच फोन करून साहेब काही होत असेल तर पाहा ना, माझ्या वडिलाला दाखल करायचे आहे, अशी विनंती करणारे फोन येत आहेत. पण शासकीय व खासगी रुग्णालयातही जागा नसल्याने त्यांचेही काहीच चालत नसल्याचे चित्र आहे. कोरोनाबाधित गंभीर रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, तर खासगी कोविड रुग्णालयात दाखल रुग्णांना रेमडेसिविर इंजेक्शन लिहून दिले जात आहे. मात्र, रेमडेसिविर इंजेक्शनचा सर्वत्र तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे याचा काळाबाजार रोखण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातून सर्व वितरकांना आणि खासगी कोविड रुग्णालयांना याचा पुरवठा केला जात आहे. मात्र, कोरोना रुग्णांची संख्या अधिक असून, त्या तुलनेत रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा होत नसल्याने रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची मोठी परवड होत आहे. ही परवड पाहून कुणाचेही डोळे पाणावल्याशिवाय राहणार नाहीत, अशी स्थिती आहे.

.......

रुग्णालयातून इंजेक्शन बाहेर कसे?

जिल्ह्यात सध्या कोरोनाचा उद्रेक झाला असून, रेमडेसिविर इंजेक्शन आणि ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. रेमडेसिविर इंजेक्शन मेडिकलमध्येही मिळत नसले तरी खासगी रुग्णालयातून रेमडेसिविर इंजेक्शन बाहेर येत असून, एका इंजेक्शनची १३ ते २० हजार रुपयांनी विक्री केली जात आहे. रुग्णालयातून रेमडेसिविर इंजेक्शन कसे बाहेर येत आहे, हा सुद्धा संशोधनाचा विषय आहे.

........

यांच्यावर कारवाई करणार काेण?

सध्या मेडिकल आणि रुग्णालयामध्ये सुद्धा रेमडेसिविर इंजेक्शन मिळत नसल्याचे चित्र आहे. मात्र, दुसरीकडे मार्केटमध्ये रेमडेसिविर इंजेक्शन १३ ते २० हजार रुपयांना उपलब्ध करून दिले जात आहे, तर हे इंजेक्शन उपलब्ध करून देणारे सुद्धा काही रुग्णालयांशी संबंधित असल्याची माहिती आहे. त्यामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची लूट करणाऱ्यांवर कारवाई केव्हा करण्यात येणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे.