शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

‘मुझे मरने दो’ एवढी एकच रट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2021 05:00 IST

केटीएस रुग्णालयातील प्रशिक्षणार्थी डॉक्टर रोली गुप्ता या ड्यूटीवर असताना त्यांची नजर या रुग्णावर पडली होती. देवरी ग्रामीण रुग्णालयातून आणलेल्या या रुग्णाला कुणीही भेटायला आले नाही. तसेच ते उपचार करू देत नसल्याने डॉ. गुप्ता यांनी त्यांना आपुलकीने विचारपूस करून आपला डबा जेवण्यास दिला व बघितले असता त्यांच्या पायाला जखम असून त्यात गॅँगरीन झाल्याचे कळले.

ठळक मुद्दे त्या रुग्णावर होणार शस्त्रक्रिया : आतापर्यंत कुणीही आले नाही भेटायला

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया :  येथील केटीएस रुग्णालयात १३ जुलैपासून भरती असलेल्या त्या रुग्णाच्या नातेवाईकांचा अद्यापही पत्ता लागलेला नसून त्यांना भेटायला कुणीही आलेले नाही. मात्र ‘लोकमत’ ने घेतलेल्या बातमीची दखल घेत आता त्या रुग्णाच्या पायावर शस्त्रक्रिया केली जाणार आहे. असे असतानाही त्या रुग्णाच्या मनात नेमके काय सुरू आहे हे डॉक्टरांना कळेनासे झाले असून ‘मुझे मरने दो’ फक्त एवढेच शब्द त्या रुग्णाच्या तोंडून निघत आहेत. केटीएस रुग्णालयातील प्रशिक्षणार्थी डॉक्टर रोली गुप्ता या ड्यूटीवर असताना त्यांची नजर या रुग्णावर पडली होती. देवरी ग्रामीण रुग्णालयातून आणलेल्या या रुग्णाला कुणीही भेटायला आले नाही. तसेच ते उपचार करू देत नसल्याने डॉ. गुप्ता यांनी त्यांना आपुलकीने विचारपूस करून आपला डबा जेवण्यास दिला व बघितले असता त्यांच्या पायाला जखम असून त्यात गॅँगरीन झाल्याचे कळले. यावर त्यांनी केटीएस रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाईकांसाठी जेवणाची सोय करणारे प्रतीक कदम यांच्याशी संपर्क साधला व तेथूनच हा प्रकार उघडकीस आला. याबाबत ‘लोकमत’ने १ ऑगस्ट रोजी बातमी प्रकाशित केली. त्यानंतर आता रुग्णालय प्रशासनाने दखल घेत त्या रुग्णाच्या पायावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र त्यांचा मधुमेह जास्त वाढला असल्याने ते नियंत्रित करण्यासाठी औषध सुरू आहेत. असे असतानाही त्या रुग्णाला जगण्याची इच्छा दिसत नसल्याने ते उपचार घेण्यासाठीही तयार नसून फक्त ‘मुझे मरेन दो’ एवढेच ते डॉक्टरांना बोलत आहेत. 

लायन्स क्लबने घेतली त्यांची जबाबदारी - डॉ. गुप्ता यांनी त्या रुग्णावर शस्त्रक्रिया केल्यानंतर पाय बरा होईपर्यंत त्यांना रुग्णालयात ठेवता येणार. मात्र त्यांच्या नातेवाईकांचा पता न लागल्याने त्यानंतर काय होणार असे सांगितले. अशात त्यांची मन:स्थिती सुधारण्यासाठी अधिष्ठाता डॉ. नरेश तिरपुडे व डॉ. संजय माहुले यांच्या सहकार्याने मानसोपचारतज्ज्ञांकडून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अशातच लायन्स क्लबचे प्रतीक कदम व कालूराम अग्रवाल यांनी त्या रुग्णासाठी लागणारे औषध तसेच पुढे त्यांना वृद्धाश्रमात ठेवण्याची सोय करण्याची जबाबदारी घेण्यास सकारात्मकता दर्शविली आहे.

 

टॅग्स :doctorडॉक्टरhospitalहॉस्पिटल