शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामसेवकांचा जिल्हा परिषदवर मूक मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 00:20 IST

ग्रामपंचायतच्या नियमीत कामाचा अतिरिक्त बोझा ग्रामसेवकांवर आहे. अतिरिक्त ताण, आर्थिक पिळवणूकीमुळे राज्यातील ५० ग्रामसेवकांनी मागील दोन वर्षात आत्महत्या केल्या. कामाच्या तणावात असताना ग्रामसेवकांचे झालेले अपघात व काही नागरिकांकडून १५०० ग्रामसेवकांवर झालेले प्राणघातक हल्ले .....

ठळक मुद्देप्रश्नांकडे वेधले लक्ष : १५०० ग्रामसेवकांवर प्राणघातक हल्ले

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : ग्रामपंचायतच्या नियमीत कामाचा अतिरिक्त बोझा ग्रामसेवकांवर आहे. अतिरिक्त ताण, आर्थिक पिळवणूकीमुळे राज्यातील ५० ग्रामसेवकांनी मागील दोन वर्षात आत्महत्या केल्या. कामाच्या तणावात असताना ग्रामसेवकांचे झालेले अपघात व काही नागरिकांकडून १५०० ग्रामसेवकांवर झालेले प्राणघातक हल्ले याचा निषेध नोंदविण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्या नेतृत्त्वात बुधवारी (दि.२४) जिल्हा परिषदेवर मूक मोर्चा काढण्यात आला.ग्रामीण जनतेशी निगडीत कामे करताना ग्रामसेवकांना बऱ्याच तणावात राहावे लागते. गाव पातळीवर तलाठी, कृषी सहाय्यक, आरोग्य सेवक, वॉयरमन, ग्रामविकास सोसायटीचे सचिव, अंगणवाडी सेविका, मुख्याध्यापक, शिक्षक हे घटक असतानाही त्यांची कामे ग्रामसेवकांकडे सोपविली जातात. कर्जमाफी फार्म भरणे, कर्जासंबधी ग्रामसभा, बोंडअळीचे पंचनामे, घर विद्युत सर्वेक्षण, कृषी पिक विमा, पीक कापणी प्रयोग, मतदार याद्या सर्वेक्षण, पाणलोटाची कामे, नवीन वाळू धोरण, स्वच्छ भारत मिशन, महसूल विभागाच्या वैयक्तीक लाभाच्या योजना, बोगस रेशनकार्ड मोहीम अशी विविध कामे दिली जातात. मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांचा दबाव, विना चौकशी, विना नोटीसाने निलंबित केले जाते. वेतनवाढ बंद करणे, विना पगारी करणे, यामुळे त्रस्त झालेल्या ग्रामसेवकांचे कुणीही ऐकायला तयार नाहीत. त्यामुळे ग्रामसेवकांनी बुधवारी जिल्हा परिषदेवर मूक मोर्चा काढून त्यांच्या समस्यांकडे शासन आणि प्रशासाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. धुळे जिल्ह्याच्या गोंदूर येथील ग्रामसेवक एस.बी.वाघ यांना आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. मोर्च्याचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष कमलेश बिसेन, सचिव दयानंद फटींग, मानद अध्यक्ष कार्तिक चव्हाण, उपाध्यक्ष सचिन कुथे, कविता बागडे,, एल.आर.ठाकरे, सुनील पटले, सुरेश वाघमारे, ओ. के. रहांगडाले, सुषमा वाढई, सुभाष सिरसाम, रामेश्वर जमईवार, परमेश्वर नेवारे, योगेश रूद्रकार, पांडुरंग हरिणखेडे, धर्मेंद्र पारधी, ओ.जी. बिसेन, रितेश शहारे, तारेश कुबडे यांनी केले.