शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

सांघिक खेळाचे महत्त्व अनन्यसाधारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 21:44 IST

सांघिक पध्दतीच्या खेळांमध्ये प्रत्येक खेळाडूंचा एकमेकांशी संवाद असतो. त्यामुळे संघ भावनेची वाढ होते. कुणी आपल्या संघासाठी खेळतो त्याला प्रोत्साहन दिले पाहिजे.

ठळक मुद्देमंगेश मोहिते : अवघा महाराष्ट्र फुटबॉलमय उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : सांघिक पध्दतीच्या खेळांमध्ये प्रत्येक खेळाडूंचा एकमेकांशी संवाद असतो. त्यामुळे संघ भावनेची वाढ होते. कुणी आपल्या संघासाठी खेळतो त्याला प्रोत्साहन दिले पाहिजे. सांघिक खेळामुळे एकात्मतेची भावना निर्माण होत असल्याने अशा प्रकारच्या खेळाचे महत्व अनन्यसाधारण असल्याचे प्रतिपादन अप्पर जिल्हाधिकारी मंगेश मोहिते यांनी येथे केले.शुक्रवारी इंदिरा गांधी स्टेडियम येथे जिल्हा क्र ीडा कार्यालय, शिक्षण विभाग जिल्हा परिषद आणि जिल्हा क्रीडा परिषदेतर्फे ‘अवघा महाराष्ट्र फुटबॉलमय’ या कार्यक्रमात ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय अधिकारी अनंत वालसकर, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, उपशिक्षणाधिकारी सुरेश मांढरे, स्काऊट गाईड कार्यालयाच्या जिल्हा संघटक मनिषा तराळे, तालुका क्रीडा संयोजक एस.ए.वहाब, फुटबॉल असोशिएशनचे खुर्शिदभाई, लेखाधिकारी एल.के.बाविस्कर, डॉ.हरगोविंद चौरसीया, जिल्हा क्रीडा अधिकारी सुभाष गांगरेड्डीवार उपस्थित होते.मोहिते म्हणाले, सांघिकपणे खेळतांना मदत केली पाहिजे ही भावना देशपातळीवर देखील दिसून येते. एकमेकांशी आपली स्पर्धा असते. मात्र संघ म्हटला की आपण सर्वजन सारखे असतो. संघासाठी आपण एकमेकांना मदत करतो. जीवनात प्रत्येकाने एकमेकांना मदत केली तर प्रत्येक व्यक्ती यशस्वी होवू शकतो असेही ते म्हणाले. यावेळी क्रीडा क्षेत्रात योगदान देणाºया तालुका क्रीडा संयोजक एस.ए.वहाब, फुटबॉल असोशिएशनचे खुर्शिदभाई यांचा अपर जिल्हाधिकारी मोहिते यांच्या हस्ते शाल, श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला.गांगरेड्डीवार म्हणाले, आॅक्टोबर महिन्यात फिफा वर्ल्ड कप फुटबॉल आयोजन भारतात करण्यात आले आहे. त्यापैकी ६ सामने मुंबई येथे होत आहेत. ग्रामीण भागात सुध्दा फुटबॉल खेळाची चळवळ गतीमान झाली पाहिजे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी क्रीडा मार्गदर्शक नाजुक उईके, वरिष्ठ लिपीक डी.एस.बारसागडे, शिवचरण चौधरी, रवी परिहार यांनी सहकार्य केले.जिल्ह्यातील १२ हजारांवर खेळाडूंचा सहभागजिल्ह्यात शुक्रवारी १२ हजार ३२० खेळाडूंनी फुटबॉल खेळून या खेळाला प्रोत्साहान देण्याचे काम केले. यामध्ये ८ हजार २२० मुले आणि ४१०० मुलीचां समावेश आहे. जिल्ह्यातील विविध मैदानावर १२ हजारावर खेळाडूंनी फुटबॉल यात सहभागी होत आनंद फुटबालचा आनंद लुटला.विविध शाळा महाविद्यालयांचा सहभाग‘अवघा महाराष्ट्र फुटबॉलमय’ या कार्यक्रमात गोंदिया येथील एनएमडी महाविद्यालय, एस.एस.गर्ल्स महाविद्यालय, मनोहर मुन्सीपल हायस्कूल,राजस्थानी मारवाडी हायस्कूल, महावीर महाविद्यालय, गुरु नानक इंग्लीश स्कूल, मनोहर मुन्सीपल कॉन्व्हेंट, एन.एम.पटेल महाविद्यालय, गोंदिया फुटबॉल अ‍ॅकेडमी, सिटी क्लब गोंदिया आदी संघाचे फुटबॉल खेळाडू उपस्थित होते.