शहरं
Join us  
Trending Stories
1
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
2
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
3
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
4
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
5
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
6
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
7
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
8
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
9
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
10
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
11
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
12
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
13
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
14
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
15
दररोज अंगाला साबण लावत असाल तर आताच बदला सवय; कधी, किती वेळा करायचा वापर?
16
इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू, या देशाचा ‘पेले’ अशी होती ओळख 
17
एका घरात दोनच 'लाडक्या बहिणी', इतरांचा होणार पत्ता कट; सरकारच्या नियमानं महिला धास्तावल्या
18
सॅमसंग गॅलेक्सी एस २४ अल्ट्रा ५० हजारांनी स्वस्त, कॅमेरा क्वालिटीत कुठलंही कॉम्प्रमाइज नाही!
19
मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीचा लग्नानंतर ६ महिन्यातच मृत्यू; प्रकरणात आला नवा ट्विस्ट
20
रक्षाबंधन सणासाठी जाताना अपघात; आई-वडीलांच्या डोळ्यांदेखत चिमुकल्याचा मृत्यू, गडचिरोलीतील घटना

सिद्धी, वैष्णवी व आर्यन ठरले मानकरी

By admin | Updated: September 3, 2016 00:02 IST

लोकमत बाल विकास मंचच्या वतीने बालकांच्या अंगी असणाऱ्या सुप्त गुणांना वाव मिळवून देण्यासाठी गीतगायन स्पर्धा घेतली

एकल व समूह स्पर्धा : आंतरशालेय समूह गीत स्पर्धेत शारदा कॉन्व्हेंट प्रथम, चिमुकल्यांच्या गीतांनी भारावले श्रोतेगोंदिया : लोकमत बाल विकास मंचच्या वतीने बालकांच्या अंगी असणाऱ्या सुप्त गुणांना वाव मिळवून देण्यासाठी गीतगायन स्पर्धा घेतली. यात लहानग्यानी शर्तीने प्रयत्न करून उत्कृष्टरित्या गीतांचे सादरीकरण केले. या स्पर्धेत प्रथम क्रमांक सिद्धी कनोजिया, द्वितीय वैष्णवी दुबे तर तृतीय क्रमांक आर्यन पारधी याने पटकाविले. लहानसहान बालकांच्या अंगी असलेल्या वेगवेगळ्या कलागुणांवा वाव व मंच उपलब्ध करून देण्याच्या दिशेने नेहमीच लोकमत वृत्तपत्र अग्रसर राहिला आहे. याच अनुषंगाने लोकमत बाल विकास मंचच्या वतीने वर्षभर वेगवेगळ्या कार्यक्रमांची मेजवानी सर्वांसाठी उपलब्ध असते. आपल्या मधूर सुरांनी जग जिंकण्याचा उद्देश जपणाऱ्या चिमुकल्या गीतप्रेमींसाठी लोकमत बाल विकास मंचने आंतरशालेय गीत स्पर्धा स्थानिक श्री गणेशन फंक्शन हॉल, गणेशनगर गोंदिया येथे गणेशन कॉन्व्हेंटच्या विशेष सहकार्याने पार पाडले. सुरांची देवी सरस्वती व स्वातंत्र सेनानी तसेच लोकमतचे संस्थापक स्व. जवाहरलालजी दर्डा यांच्या तैलचित्रावर माल्यार्पण करून आंतरशालेय गीतगायन स्पर्धेची सुरूवात करण्यात आली. या वेळी विदर्भ स्टडी सर्कलचे डायरेक्टर त्रिलोक शेंडे, इंदिरा गांधी आयटीआयचे मुख्याध्यापक जोगेंद्र गजभिये, गणेशन कॉन्व्हेंटचे संस्थापक अखिलेश्वर स्वामी, लोकमतचे जाहिरात प्रतिनिधी अतुल कडू प्रामुख्याने उपस्थित होते.कार्यक्रमाच्या सुरूवातीला सत्यम शिवम सुंदरम या मनोरम गीताने विद्यार्थ्यांनी श्रोत्यांचे मन मोहून घेतले. अचूतम केशवम कृष्ण दामोदरम, मेरी मॉ, राधा ही बावरी, केशवा माधवा, अग संगतीनं माझ्या तू येशील का, तुमसे मिलकर ऐसा लगा, तू कितनी अच्छी है, यशोमती मैया से बोले नंद लाला, रंग दे बसंती यासारख्या मधूर गीतांवर विद्यार्थ्यांनी स्वरसाद चढविला. लहानसहान विद्यार्थ्यांच्या मुखातून निघालेल्या सुमधूर गीतांनी श्रोत्यांना चांगलेच भारावून घेतले.गीतगायन स्पर्धेला परीक्षक म्हणून विनोद शरणागत व सम्राट राजेपांडे उपस्थित होते. प्रास्ताविक इव्हेंट जिल्हा संयोजक श्रीकांत पिल्लेवार यांनी मांडले. आभार जिल्हा संयोजिका दिव्या भगत यांनी मानले. संचालन रामभरूस चक्रवर्ती यांनी केले. कार्यक्रमासाठी रौनक उदापुरे, संतोष बिलोने, कमलेश भुजाडे, अनूप कुर्वे यांनी सहकार्य केले. या वेळी श्रोत्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. (प्रतिनिधी)