नि:शुल्क रक्त व औषध : १ लाख ९६ हजार ७५३ जणांची चाचणीगोंदिया : राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या अधिनस्त सिकलसेल विभागाद्वारे सन २०१४-१५ मध्ये जिल्ह्यात एकूण एक लाख ९६ हजार ७५३ रूग्णांची तपासणी करण्यात आली. यात एसएस पॅटर्नचे १२८ सिकलसेलग्रस्त रूग्ण आढळले आहेत. सिकलसेल निर्मूलनासाठी आरोग्य विभाग विशेष प्रयत्न करीत आहे. या रूग्णांना औषधी नि:शुल्क दिली जाते. तसेच रक्ताचासुद्धा नि:शुल्क पुरवठा केला जातो, असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.मागील तीन वर्षांपूर्वी सन २०१२-१३ मध्ये सिकलसेल रोगनिदानासाठी एक लाख ६६ हजार २१५ रूग्णांची सोल्युबिलिटी टेस्ट करण्यात आली होती. त्यानंतर सन २०१३-१४ मध्ये एक लाख ७७ हजार ९९५ रूग्णांची चाचणी करण्यात आली. तर सन २०१४-१५ मध्ये एक लाख ९६ हजार ७५३ सोल्युबिलिटी चाचण्या करण्यात आल्या. यात सिकलसेलग्रस्त १२८ (एसएस) व वाहक १,७८८ (एएस) आढळले. या दोन प्रकारांमुळे येण्या पिढीमध्ये सिकलसेल होण्याची शक्यता अधिक असते. सिकलसेल आजाराबाबतचे तज्ज्ञ सांगतात की, रूग्णांनी विवाहापूर्वी चिकित्सकांचा सल्ला घ्यावा. त्यांच्या सल्ल्यानेच विवाह करावे. त्यामुळे येणाऱ्या पिढीत सिकलसेल होण्याची शक्यता नसते किंवा कमी असते. सिकलसेल हे असाध्य रोग तर नाही, परंतु आनुवंशिक आहे. योग्य औषधोपचार, योग्य आहार-विहार व संयम ठेवले तर या आजारावर नियंत्रण मिळविले जावू शकते. रक्ताची कमी, हात-पाय फुलने, पीलिया, असह्य वेदना, हात किंवा पायाला बरी न होणारी जखम, जननेंद्रियाला त्रास आदी बाबी सिकलसेलची लक्षणे सांगितली जातात. सिकलसेल ग्रस्ताने सिकलसेल ग्रस्ताशी (एसएस) कधीही लग्न करू नये. असे लग्न झाले तर येणारी पिढी ग्रस्तच असते. परंतु सामान्य निरोगी (एए) व्यक्तिशी ग्रस्ताचे विवाह झाले तर येणाऱ्या पिढी ग्रस्त नसते. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने आपले विवाह सिकलसेल चाचणीनंतरच जोडण्याचे आवाहन त्या विभागाकडून करण्यात येते. सिकलसेल आजारामुळे अनेकांची घाबरगुंडी उडते. मात्र घाबरण्यासारखे तेवढे नाही. याचे रूग्ण आपल्या राज्यात नव्हे तर देशभरात व विदेशातही आढळतात. हे आजार आणुवंशिक आहे. परंतु सिकलसेल जनजागृती मोहिमेद्वारे लोकांना जागृत केले जात आहे. त्यामुळे येणाऱ्या पिढीत सिकलसेलचे प्रमाण अत्यंत कमी होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. गोंदियाच्या केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयात एक विशेष कक्ष सिकलसेल विभागासाठी बनविण्यात आले आहे. त्यात चाचण्या केल्या जातात. तसेच त्यांना समुपदेशनही केले जाते. (प्रतिनिधी)विवाहापूर्वी सिकलसेल चाचणी करावीमानवी रक्ताच्या सोल्युबिलिटी चाचणीत चार प्रकारचे पॅटर्न आढळतात. यात एए पॅटर्नचा व्यक्ती निरोगी असतो. एसएस पॅटर्न आढळले तर तो सिकलसेलग्रस्त असतो. जर एएस किंवा एसए पॅटर्न आढळले तर तो सिकलसेलचा वाहक असतो. हा वाहक सामान्य व्यक्तीप्रमाणे जीवन जगू शकतो. परंतु एएस पॅटर्नच्या व्यक्तीने एएस पॅटर्नच्या व्यक्तिशी लग्न केले तर ५० टक्के सिकलसेलग्रस्त रूग्ण व ५० टक्के सामान्य व्यक्ती जन्माला येण्याची शक्यता असते. जर निरोगी एए पॅटर्नच्या व्यक्तीने एसएस (ग्रस्त) सह विवाह केला तर येणारी पिढी १०० टक्के वाहक असते. एए पॅटर्नच्या व्यक्तीचे लग्न एएस वाहकाशी झाले तर ७५ टक्के निरोगी (एए) व २५ टक्के वाहक (एएस) होण्याची शक्यता असते. त्यामुळे विवाहापूर्वी प्रत्येक तरूण-तरूणीने सिकलसेल चाचणी करून घेणे अत्यावश्यक आहे.
वर्षभरात आढळले सिकलसेलचे १२८ रूग्ण
By admin | Updated: July 15, 2015 02:14 IST