शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

अच्छे दिनचे स्वप्न दाखविणाऱ्यांना त्यांची जागा दाखवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2018 00:43 IST

केंद्र व राज्यातील भाजप सरकारने सत्तेवर येण्यापूर्वी जनतेला मोठी मोठी आश्वासने देऊन अच्छे दिनचे स्वप्न दाखविले. मात्र मागील चार वर्षांत यापैकी एकाही आश्वासनाची पुर्तता केली नाही. भाजप सरकारच्या काळात शेतकरी, सर्वसामान्य जनता, युवक हे सारचे त्रस्त आहेत.

ठळक मुद्देप्रफुल्ल पटेल : सडक अर्जुनी येथे प्रचार सभा

लोकमत न्यूज नेटवर्कशेंडा-कोयलारी : केंद्र व राज्यातील भाजप सरकारने सत्तेवर येण्यापूर्वी जनतेला मोठी मोठी आश्वासने देऊन अच्छे दिनचे स्वप्न दाखविले. मात्र मागील चार वर्षांत यापैकी एकाही आश्वासनाची पुर्तता केली नाही. भाजप सरकारच्या काळात शेतकरी, सर्वसामान्य जनता, युवक हे सारचे त्रस्त आहेत. त्यामुळे जनतेला अच्छे दिन येणारची खोटी स्वप्ने दाखविणाऱ्यांना त्यांची जागा दाखवा असे आवाहन खा. प्रफुल्ल पटेल यांनी येथे केले.भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपा, पिरीपाचे अधिकृत उमेदवार मधुकर कुकडे यांच्या निवडणूक प्रचारार्थ सडक-अर्जुनी तालुक्यातील शेंडा येथे आयोजित प्रचार सभेला संबोधित करताना ते बोलत होते.या वेळी माजी आ. रामरतन राऊत, प्रदेश सदस्य मनोहर चंद्रिकापुरे, माजी सभापती राजेश नंदागवळी, माजी जि.प.सदस्य मिलन राऊत, जि.प.सदस्य सरीता कापगते, डॉ. अविनाश काशिवार, हिरालाल चव्हाण, छाया चव्हाण, रजनी गिऱ्हेपुंजे, यदवती उईके, गजानन परशुरामकर, सा.का.अल्लाउद्दीन राजानी, आनंद इळपाते, धनलाल मानवटकर, सरपंच शालिकराम भेंडारकर उपस्थित होते.पटेल म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा फडणवीस सरकारने केली. मात्र आॅनलाईन आॅफ लाईनच्या तिढ्यामुळे अद्यापही शेतकरी कर्जमुक्त झाला नाही. शेतकऱ्यांच्या शेतमालाला उत्पादन खर्चासह दीडपट मोबदला देण्याचे आश्वासन मोदी सरकारने दिले होते. मात्र ते आश्वासन सुध्दा फोल ठरले आहे. बेरोजगार युवकांच्या हाताला काम नाही. शेतकरी आत्महत्येचे प्रमाण कमी झाले नाही. डिझेल, पेट्रोलचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. २०१४ पासून ओबीसी विद्यार्थ्याना शिष्यवृत्तीचे वाटप झाले नाही. देशात नोटबंदी करुन सर्व सामान्य जनतेला लाईनमध्ये उभे ठेवण्याचे काम या सरकारने केले. शेतकऱ्यांना अद्यापही धानाच्या बोनसची रक्कम मिळाली नाही. त्यामुळे शेतकरी बेजार झाला आहे. आघाडी सरकारने २००८ मध्ये शेतकऱ्यांचे कर्जमाफ केले होते. त्यावेळी आॅनलाईन आॅफलाईनचा तिढा निर्माण न करताच शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केला होता. मात्र आता केंद्र व राज्यातील सरकार सर्वच आघाड्यांवर फेल ठरले आहे. त्यामुळे अशा विश्वासघाती सरकारला धडा शिकविण्याची हीच योग्य वेळ आहे. यासाठी कुकडे यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन पटेल यांनी केले.

टॅग्स :prafull patelप्रफुल्ल पटेल