शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छता निरीक्षकांना कारणे दाखवा नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2020 06:00 IST

राज्यात प्लास्टिक बंदी असतानाही बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्या व अन्य साहित्यांचा सर्रास वापर सुरू आहे. प्लास्टिकचे मानव व पशुंच्या आरोग्यावरील दुष्परिणाम तसेच पर्यावरणासाठीही किती घातक ठरत आहे, याची प्रचिती आता येऊ लागली आहे. हे सर्व थांबविण्यासाठी प्लास्टिक वस्तूंचा वापर पूर्णपणे बंद करणेचे आहे. ही बाब गांभीर्याने घेत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी प्लास्टिक बंदीसाठी कंबर कसली आहे.

ठळक मुद्देप्लास्टिक बंदीला घेऊन दणका : मुख्याधिकाऱ्यांनी विचारला जाब

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : राज्य शासनाने येत्या १ मे पर्यंत राज्याला सिंगल यूज प्लास्टिक मुक्त करण्याची संकल्पना मांडली आहे. त्यानुसार, सर्वच महानगर पालिका, नगर पालिका व नगर पंचायतींना दिशानिर्देश देण्यात आले आहेत. मात्र गोंदिया नगर परिषदेकडून पाहिजे त्या प्रमाणात कार्य होत नसल्याचे लक्षात घेत मुख्याधिकारी चंदन पाटील यांनी स्वच्छता निरीक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावून जाब विचारला आहे.राज्यात प्लास्टिक बंदी असतानाही बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्या व अन्य साहित्यांचा सर्रास वापर सुरू आहे. प्लास्टिकचे मानव व पशुंच्या आरोग्यावरील दुष्परिणाम तसेच पर्यावरणासाठीही किती घातक ठरत आहे, याची प्रचिती आता येऊ लागली आहे. हे सर्व थांबविण्यासाठी प्लास्टिक वस्तूंचा वापर पूर्णपणे बंद करणेचे आहे. ही बाब गांभीर्याने घेत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी प्लास्टिक बंदीसाठी कंबर कसली आहे. यातूनच त्यांनी येत्या १ मे पर्यंत सिंगल यूज प्लास्टिक मुक्तची संकल्पना मांडली आहे. त्यानुसार, राज्यातील सर्व महानगर पालिका, नगर पालिका, नगर पंचायतींना आपापले शहर सिंगल यूज प्लास्टिक मुक्त करण्यासाठी तारीख निहाय कार्य करण्यासाठी दिशानिर्देश दिले आहेत. विशेष म्हणजे, आता या विषयाला घेऊन सुमारे महिनाभरापूर्वी संबंधितांना पत्र पाठविण्यात आले आहेत. त्यानंतरही गोंदिया नगर परिषदेने अपेक्षेच्या तुलनेत काहीच कार्य केले नसल्याचे दिसत आहे. ही बाब जाणून मुख्याधिकारी पाटील यांनी स्वच्छता विभागातील स्वच्छता निरीक्षकांना मंगळवारी (दि.१७) कारणे दाखवा नोटीस बजावले आहे. तसेच २४ तासांच्या आत त्यावर जाब विचारला आहे.कंत्राटी कर्मचारीही वांद्यातनगर परिषदेत स्थायी तत्वावर कार्यरत स्वच्छता निरीक्षक असताना काही कंत्राटी तत्वावर स्वच्छता निरीक्षक घेण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, त्यांनाही नोटीस बजावण्यात आले आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांनी स्थायी कर्मचाऱ्यांच्या अधिनस्थ काम करावे लागत असताना मात्र त्यांनाही नोटीस देण्यात आल्याने स्वच्छता विभागात चांगलीच खळबळ माजली आहे.

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदीMuncipal Corporationनगर पालिका