शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

वाहकांच्या कमतरतेमुळे उन्हाळी हंगामाचे नियोजन लांबले

By admin | Updated: March 4, 2017 00:10 IST

सुरक्षित प्रवासाचे ब्रीद घेऊन धावणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस संचालित करण्यासाठी गोंदिया व तिरोडा आगारात चालक-वाहकांची कमतरता आहे.

गोंदिया व तिरोडा आगार : शाळा बंद झाल्यावर अतिरिक्त बसेस सुरू होणार गोंदिया : सुरक्षित प्रवासाचे ब्रीद घेऊन धावणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस संचालित करण्यासाठी गोंदिया व तिरोडा आगारात चालक-वाहकांची कमतरता आहे. त्यामुळे दोन्ही आगारांचे उन्हाळी नियोजन लांबणीवर गेल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. दिवाळी व उन्हाळ्याच्या सुट्या तथा लग्नसराई यामुळे एसटीच्या प्रवासाला या दिवसांत चांगलाच प्रतिसाद मिळतो. याच कालावधीत आगारांचे उत्पन्नसुद्धा अधिक होते. अन्यथा आगारांना अधिक उत्पन्नाची मजल गाठणे कठिण जाते. उन्हाळ्यात बाहेरगावी जाणाऱ्या व बाहेरगावावरून येणाऱ्या प्रवाशांकडून एसटी प्रवासाला चांगली पसंती मिळत असल्याचे मागील अनेक वर्षांच्या आकडेवारीवरून दिसून येते. परंतु यंदा गोंदिया व तिरोडा आगारात चालक-वाहकांची पदे रिक्त असल्याने उन्हाळी नियोजन लांबणीवर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे शाळा बंद झाल्यावर मानव विकास कार्यक्रमांतर्गत धावणाऱ्या स्कूल बसेस व त्यांचे चालक-वाहक उपलब्ध होऊ शकतील. तेव्हाच १० ते १५ एप्रिलदरम्यान उन्हाळी हंगामासाठी अतिरिक्त बसफेऱ्या सोडल्या जातील, अशी माहिती संबंधित सूत्रांनी दिली आहे. गोंदिया आगारात एकूण ९० बसेस आहेत. त्यापैकी २८ बसेस मानव विकास कार्यक्रमाच्या असून त्या ‘स्कूल बसेस’ म्हणून धावतात. तर चालकांची १५५ व वाहकांची १५५ पदे मंजूर आहेत. मात्र प्रत्यक्ष चालक १३७ व वाहकही १३७ आहेत. त्यातच दोन वाहकांचे बदली आदेश आल्याने आता गोंदिया आगारात केवळ १३५ वाहक राहणार आहेत. मात्र सहा कर्मचारी असे आहेत जे चालक व वाहक या दोन्ही पदावरील काम सांभाळतात. शिवाय मागील अनेक वर्षांपासून वाहतूक अधिकाऱ्यांचे पद रिक्त असून तो प्रभार भंडारा जिल्ह्यातील वाहतूक अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आला आहे. तर तिरोडा आगारात एकूण बसेस ४८ असून यापैकी ७ मानव विकास कार्यक्रमाच्या स्कूल बसेस आहेत. येथे ७६ चालक कार्यरत आहेत. त्या तुलनेत वाहकांची सात पदे रिक्त असल्याने ६९ पदे कार्यरत आहेत. या प्रकारामुळे त्यांना ओव्हरटाईम करावा लागतो. प्रसंगी वाहकाची प्रकृती अस्वस्थ असली किंवा त्याने ओव्हरटाईम करण्यास नकार दिला तर मात्र फेरी रद्द करण्याची पाळी येते. चालक-वाहकांच्या पदांच्या कमतरतेचा परिणाम उन्हाळी हंगामाच्या नियोजनावर पडला असून ते लांबल्याचे समजते.(प्रतिनिधी) ग्रामीण भागात फेऱ्या वाढविण्यावर भर राज्य परिवहन महामंडळाच्या वरिष्ठ कार्यालयाकडून लांब पल्ल्यांच्या बसेस सुरू करण्यापेक्षा ग्रामीण भागात फेऱ्या वाढविण्यात याव्या, असे आदेश आगारांना देण्यात आले आहेत. त्यामुळे स्थानिक पातळीवर लांब पल्ल्यांच्या बसेस सुरू करण्याऐवजी ग्रामीण भागात फेऱ्या वाढविण्यावर भर दिला जात आहे. मात्र उन्हाळी हंगाम बघता गोंदिया आगारातून १ एप्रिलपासून एक किंवा दोन बसफेऱ्या सुरू करण्यात येतील, असे संबंधितांनी सांगितले आहे.