शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

दुकान बंद, व्यापार बंद, मगर भीड रास्तेपर, हा कसला लॉकडाऊन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 05:00 IST

राज्य शासनाने ‘ब्रेक द चेन’अंतर्गत ५ एप्रिलपासून नवीन निर्बंध लागू केले आहेत. यात अत्यावश्यक सेवा व जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता सर्वच दुकाने ३० एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला; मात्र, हा निर्णय घेत असताना शासन आणि प्रशासनाने व्यापाऱ्यांना विश्वासात न घेताच नवीन निर्बंध लागू केले. त्यामुळे उद्योगधंदे संकटात आले असून, यावर अवलंबून असणाऱ्या हजारो कामगारांचा रोजगार बुडाला आहे.

ठळक मुद्देदुकाने सुरु करा : व्यापाऱ्यांचा सवाल, दुकानांसमोर केली व्यापाऱ्यांनी निदर्शने

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया :  ‘दुकान बंद, व्यापार बंद मगर भीड रस्तेपर’ हा कसला लॉकडाऊन आहे. यह खाेकले लॉकडाऊन का हम विरोध करते है, असे फलक हातात घेऊन शुक्रवारी (दि. ९) सकाळी गोंदिया शहरातील व्यापाऱ्यांनी शांततेच्या मार्गाने सरकारच्या धोरणाविरोधात निदर्शने केली. राज्य शासनाने ‘ब्रेक द चेन’अंतर्गत ५ एप्रिलपासून नवीन निर्बंध लागू केले आहेत. यात अत्यावश्यक सेवा व जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता सर्वच दुकाने ३० एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला; मात्र, हा निर्णय घेत असताना शासन आणि प्रशासनाने व्यापाऱ्यांना विश्वासात न घेताच नवीन निर्बंध लागू केले. त्यामुळे उद्योगधंदे संकटात आले असून, यावर अवलंबून असणाऱ्या हजारो कामगारांचा रोजगार बुडाला आहे. एकीकडे शासनाने जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता इतर सर्व दुकाने बंद ठेवली आहेत; पण दुसरीकडे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी वाढली आहे. त्यावर कुणाचेही नियंत्रण नाही. जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांमध्ये कोरोना येत नाही काय? तो काय? केवळ कपड्याच्या आणि इतर दुकान येतो, असा सवाल व्यापाऱ्यांनी उपस्थित केला. नवीन निर्बंधांमुळे व्यापारी आणि नागरिकांमध्येसुद्धा संभ्रमाचे वातावरण आहे. सरसकट दुकाने बंद ठेवण्याऐवजी काही कालावधी निश्चित करून ती पूर्ववत सुरू करण्याची परवानगी देण्यात यावी. मागील वर्षीदेखील कोरोनामुळे तब्बल तीन महिने दुकाने बंद होती. त्यामुळे अनेक व्यापारी कर्जबाजारी झाले, कामगारांचा रोजगार गेला, वीजबिल, कर्जाचे हप्ते भरण्याची समस्या निर्माण झाली. यातून कसेबसे सावरत असताना आता पुन्हा व्यवसाय बंद झाल्याने व्यापारी व यावर अवलंबून असलेले कामगारसुद्धा संकटात आले आहेत. त्यामुळे शासनाने आपल्या निर्णयावर पुन्हा विचार करून निर्बंध शिथिल करण्याची मागणी संजय जैन, आशिष मेठी, रमेश टहलानिया, अजय खंडेलवाल, गोटू जैन, राजेश लुनिया, सुनील अजमेरा, अर्जुन अजमेरा यांनी केली आहे. 

आता कर्ज काढून जगायचे काय? मागीलवर्षी कोरोनामुळे तीन ते चार महिने दुकाने बंद होती. त्यामुळे व्यापार आधीच डबघाईस आला आहे. त्यातच नवीन निर्बंध लागू करून २५ दिवस दुकाने बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले. यामुळे व्यापाऱ्यांनी देणी कशी फेडायची, कामगारांना वेतन कसे द्यायचे, आता पुन्हा कर्ज काढून जगायचे काय? असा सवाल शहरातील व्यापाऱ्यांनी उपस्थित केला.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या