नरेश रहिले गोंदियाहिंदवी स्वराज्याची स्थापना करून व मराठ्यांचे राज्य दिल्लीच्या तख्तापर्यंत पोहोचविणाऱ्या शिवरायांच्या राज्यात त्यांच्याच पुतळ्यासाठी जागा मिळत नसल्याची दुर्देवी आणि संतापजनक बाब गोंदियात दिसून येत आहे. जिल्ह्याच्या निर्मितीला साडेपंधरा वर्षाचा काळ लोटला, मात्र जिल्हा मुख्यालयी त्यांचा पुतळा उभारण्यात प्रशासन व लोकप्रतिनिधींना अद्याप यश आलेले नाही.भाजपाने केंद्रात सत्ता काबीज केल्यावर महाराष्ट्रातही सत्ता काबीज करण्यासाठी निवडणुकीदरम्यान छत्रपती शिवरायांच्या नावाचा चांगलाच वापर केला. मात्र तेच भाजपचे लोकप्रतिनिधी आता शिवयांना विसरले आहेत. विधानसभा निवडणुकीदरम्यान ‘शिवछत्रपतींचा आशीर्वाद, चला देऊ मोदींना साथ’ असा नारा देत भाजपाने मोठी जाहीरातबाजी केली. परिणामी महाराष्ट्राच्या गादीवर भाजप सरकार सत्तारूढ झाले. मात्र ज्या शिवरायांच्या नावावर निवडणूक जिंकली त्याच शिवरायांना आता ते विसरले आहेत.गोंदिया जिल्ह्याची निर्मीती १ मे १९९९ ला झाली. याला १५ वर्षाचा काळ लोटला, मात्र गोंदिया शहरात छत्रपती शिवरायांचा पुतळा तयार होऊ शकला नाही. गोंदियाच्या शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून मोठ-मोठी घरे तयार झाली. परंतु शिवरायांच्या पुतळ्यासाठी आजही शिवप्रेमींना ताटकळत राहावे लागत आहे. सध्या जिल्ह्यात चारपैकी तीन भाजपचे आमदार आहेत. त्यांनाही छत्रपती शिवरायांचा विसर पडला आहे. मागील दोन वर्षापूर्वी स्थानिक आमदार गोपालदास अग्रवाल यांनीही मदत देण्याचे आश्वासन देऊन पुढील जयंतीपर्यंत पुतळा उभारण्याचे आश्वासन दिले होते. काही वर्षापूर्वी शासकीय विश्रामगृहासमोर शिवरायांचा पुतळा उभारायचे ठरले होते. परंतु त्या ठिकाणी पुतळा तयार होऊ शकला नाही. मागील काही वर्षापासून आमगाव रस्त्यावर मनोहर चौकात शिवरायांचा पुतळा उभारायचे असे ठरविण्यात आले. परंतु अजूनही गोंदियात शिवरायांचा पुतळा उभारल्या गेला नाही.
पुतळ्यासाठी शिवप्रेमींची तगमग
By admin | Updated: February 19, 2015 01:03 IST