शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

शेंडावासी रोहयोच्या कामापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 00:36 IST

लोकमत न्यूज नेटवर्कशेंडा (कोयलारी) : येथील ग्रामपंचायतने मागील वर्षी रोहयो अंतर्गत कामांच्या मागणीसाठी आराखडा तयार केला नाही. त्यामुळे शासनाकडून कामे मंजूर झाली नाही. परिणामी शेतकरी व शेतमजुरांनी कामाच्या शोधात इतरत्र पलायन करणे सुरू केल्याचे चित्र आहे.मजूर वर्गाला काम उपलब्ध करुन देण्याची जवाबदारी ग्रामपंचायत व यंत्रणेची असते. गाव परिसरात कोणकोणती कामे ...

ठळक मुद्देनियोजनशून्य आराखडा : मजुरांचे परराज्यांत पलायन सुरूच

लोकमत न्यूज नेटवर्कशेंडा (कोयलारी) : येथील ग्रामपंचायतने मागील वर्षी रोहयो अंतर्गत कामांच्या मागणीसाठी आराखडा तयार केला नाही. त्यामुळे शासनाकडून कामे मंजूर झाली नाही. परिणामी शेतकरी व शेतमजुरांनी कामाच्या शोधात इतरत्र पलायन करणे सुरू केल्याचे चित्र आहे.मजूर वर्गाला काम उपलब्ध करुन देण्याची जवाबदारी ग्रामपंचायत व यंत्रणेची असते. गाव परिसरात कोणकोणती कामे करता येतील याचा आराखडा एक वर्षाअगोदर शसनाकडे मंजुरीसाठी सादर करणे गरजेचे असते. परंतु येथील ग्रामपंचायतने तसे केले नसल्याने येथील मजूर वर्गाला काम उपलब्ध होवू शकले नाही. परिणामी कामापासून वंचित रहावे लागले आहे.अत्यल्प पाऊस व धानपिकावरील कीडरोगाने यंदा उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली. सिंचन प्रकल्पात पाण्याचा अल्पसाठा असल्याने उन्हाळी धानाच्या लागवडीवर निर्बंध लावले आहेत. वर्षभर संसाराचा गाडा कसा चालवावा या विवंचनेत मजूर व शेतकरी बांधव आहेत. या परिसरात शेती ह्ेच उदरनिर्वाहाचे एकमेव साधन आहे. कोणताही उद्योगधंदा नसल्याने मजुरांच्या हाताला काम मिळत नाही. त्यामुळे शेतकरी व मजुरांना एकमेकांवर अवलंबून रहावे लागते.यावर्षी रोहयोची कामे सुरु करण्यात आली नाही. शासनाच्या धोरणानुसार प्रत्येक मजुराला १०० दिवस काम मिळेल याचा गाजावाजा केला जातो. परंतु आजपर्यंतच्या इतिहासात १०० दिवस तर सोडा परंतु सतत ५० दिवस काम मिळाले नसल्याची वास्तविकता आहे.मागील नोव्हेंबर महिन्यात लघु पाटबंधारे विभागार्फत मुंढरीघाट पार दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झाली होती. त्यावेळी मजुरांना काम मिळेल अशी आशा होती. परंतु ते काम आठवडाभरही न चालता बंद करण्यात आले. त्यामुळे मजुरांच्या आशेवर विरजन पडले.लोकप्रतिनिधी व प्रशासन मजूर व शेतकºयांच्या समस्यांकडे नेहमीच दुर्लक्ष करतात. लोकप्रतिनिधी तर पाच वर्षातून एखाद्या वेळी या गावाला भेट देतात. त्यामुळे मजूर व शेतकऱ्यांच्या समस्या जिथल्या तिथेच राहतात. शासन व प्रशासनाने मजूर व शेतकऱ्यांच्या समस्या जाणून रोहयोची कामे युद्धस्तरावर सुरु करुन मजुरांचे होणारे पलायन थांबवावे अशी मागणी मजूर वर्गाकडून होत आहे.