शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ चार अनाथ मुलींना ५५ हजारांची मदत

By admin | Updated: June 12, 2017 01:26 IST

मानवी जीवन जगत असतानी प्रत्येकाला आपल्या कुटूंबाची आत्मीयता असते. आजच्या धकाधकीच्या

‘साकोली के सितारे ग्रुपचा’ पुढाकार : तुमसरे घेणार आरोग्याची जबाबदारींलोकमत न्यूज नेटवर्कुेबोंडगावदेवी : मानवी जीवन जगत असतानी प्रत्येकाला आपल्या कुटूंबाची आत्मीयता असते. आजच्या धकाधकीच्या जीवनात इतराविषयी सहानुभूती निर्माण होणारे क्षण विरळेच असतात, असे सर्वश्रृत घडत असले तरी आजही माणूसकी व परमार्थ साधण्याची तऱ्हा जिवंत असल्याचा प्रत्यय ‘साकोली के सितारे ग्रूप’ ने उदार अंत:करणाने ‘त्या’ चार अनाथ मुलींना रोख ५५ हजार रूपयांच्या मदतीने शनिवारी निमगाव येथे दाखवून दिली. जवळील निमगाव-बोंडगावदेवी येथील सूर्यवंशी परिवारावर दु:खाचे डोंगर कोसळून २५ दिवसांच्या फरकाने पती-पत्नीचे निधन झाल्याने चार मुली अनाथ होऊन पुढील जीवन कसे व्यतित करायचे हा प्रश्न त्या निरागस मुलींसमोर पडला. अनाथ झालेल्या ४ मुलींना समाजातील दानदात्यांकडून आर्थिक पाठबळ मिळावे हाच हेतू समोर ठेवून एक सामाजिक बांधीलकीचे प्रत अंगीकारून ‘लोकमत’ने २४ मे च्या अंकात पतीच्या पाठोपाठ पत्नीचीही प्राणज्योत मालवली. ‘त्या अनाथ लेकींना नाथाची गरज’ या मथळ्याखाली मनाला हेलावून सोडणारी बातमी प्रकाशित केली होती. सदर बातमीची दखल भंडारा जिल्ह्यातील साकोली येथील सामाजिक कार्यकर्त्यानी घेऊन ‘साकोली के सितारे या वाटसअप ग्रुपवर’ ती बातमीच पोस्ट केली. सदर ग्रुपच्या ५५ सदस्यांनी अनाथ झालेल्या त्या ४ मुलींसाठी मदत करण्याचा मनोमन संकल्प केला. डॉ. अजय तुमसरे आपल्या सहकाऱ्यांसह त्या निरागस लेकींना भेटून सांत्वना करण्यासाठी प्रत्यक्ष निमगावला त्यांच्या घरी येवून त्या चारही बहिणींची मोठ्या आस्थेने विचारपूस केली. तुमच्या उज्वल भविष्यासाठी ‘साकोली के सितारे ग्रूप’ तुमच्या सोबत राहून वेळोवेळी तुम्हाला मदतीसाठी धावून येईल व पालकांचे भरभरून प्रेम देऊ, असे आपुलकीचे अभिवचन पहिल्याच भेटीत डॉ. तुमसरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी गावकऱ्यांसमक्ष दिले. तर शनिवारी (दि.१०) डॉ. तुमसरे आपल्या सहकाऱ्यासह त्या अनाथ बहिणींच्या निमगाव या राहत्या घरी आहे. झोपडीवजा घरामध्ये तहसीलदार डी.सी.बोंबर्डे, पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे, गावचे पोलीस पाटील संजय कापगते, लहू गहाणे, माधव चचाणे यांच्या उपस्थितीत त्या ४ अनाथ लेकींच्या हातामध्ये रोख ५५ हजार रुपये ‘साकोली के सितारे ग्रूप’च्यावतीने सुपूर्द करण्यात आले. गरजू व अनाथांना मदत करण्याचा आमचा मानस असल्याचे सांगत डॉ. तुमसरे यांनी त्या चारही बहीणींच्या आरोग्याची जबाबदारी स्वत: घेत असल्याचे ग्रामस्थांसमोर सांगितले. यापुढे वेळोवेळी आमचे मदत कार्य सुरुच राहणार असल्याचेही ते म्हणाले.