शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

शहीद जान्या-तिम्या शाळा आंतरराष्ट्रीय ओजस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 00:40 IST

विद्यार्थ्यांची आतुरतेने वाट पाहणाऱ्या शासकीय शाळांना आता चांगले दिवस येऊ लागले. मुलांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था, आदिवासी विकास विभाग,...

ठळक मुद्देराज्यातील १३ शाळांचा समावेश : एक ओजसच्या अधिन राहतील नऊ तेजस शाळा

नरेश रहिलेलोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : विद्यार्थ्यांची आतुरतेने वाट पाहणाऱ्या शासकीय शाळांना आता चांगले दिवस येऊ लागले. मुलांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था, आदिवासी विकास विभाग, सामाजिक न्याय विभाग व शालेय शिक्षण विभागाच्या शाळा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळा करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयानुसार नागपूर विभागात गोंदिया जिल्ह्याच्या गोरेगाव येथील शहीद जान्या-तिम्या जि.प.उच्च प्राथमिक शाळा व चंद्रपूर जिल्ह्याची चिंचाळा येथील जि.प. शाळेची ओजस आंतरराष्ट्रीय शाळा म्हणून निवड करण्यात आली.आंतरराष्ट्रीय शाळा तयार करण्याच्या पहिल्या टप्यात १३ शाळांची ओजस म्हणून निवड करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय शाळांना महाराष्ट्र विद्या प्राधिकरणाच्या आंतरराष्ट्रीय कक्षातून मार्गदर्शन व सहकार्य मिळणार आहे. एक ओजस आंतरराष्ट्रीय शाळा आपल्या परिसरात इतर नऊ शाळांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळा करण्यात सहकार्य करेल. त्या शाळांना तेजस आंतरराष्ट्रीय शाळा म्हणून ओळखले जाईल. गोंदिया जिल्ह्यातील निवड करण्यात आलेली शहीद जान्या-तिम्या ओजस शाळेचा दौरा राज्याचे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार यांनी केला आहे. प्रधान सचिवांनी शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, शिक्षक व नागरिकांचीबैठक घेऊन त्यांना ओजस शाळेसंदर्भात मार्गदर्शन केले आहे.यंदाच्या शैक्षणिक सत्रापासून सुरूवातओजस आंतरराष्ट्रीय शाळेची सुरूवात यंदाच्या शैक्षणिक सत्रापासून होणार आहे. पाठ्यक्रम राज्य शिक्षण बोर्डाचेच राहील. नर्सरी पासून प्रवेश प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. आंतरराष्ट्रीय शाळेसाठी गुणवंत शिक्षकांची निवड केली जाणार आहे. बालकांच्या सर्वांगीण बौद्धीक, शारीरिक व शैक्षणिक स्तर उंचावण्यात येणार आहे. बालकांना आवड असलेल्या क्षेत्रानुसार त्यांना वाव दिला जाणार आहे. आंतरराष्ट्रीय शाळेसाठी विद्यार्थ्यांची संख्या निश्चीत करण्यात आली आहे. ओजस शाळा कोणत्याही आंतरराष्ट्रीय शाळा किंवा कॉन्व्हेंटपेक्षा उत्तम राहील.सहा शाळा होत्या स्पर्धेतआंतरराष्ट्रीय शाळेचा दर्जा देण्यासाठी गोंदिया जिल्ह्यातील सहा शाळा स्पर्धेत होत्या. त्यात आमगावची जि. प. हायस्कूल, गोरेगाव हिरडामालीची जि. प. उच्च प्राथमिक शाळा, शहीद जान्या-तिम्या जि. प. हायस्कूल, तिरोडाची जि. प. हायस्कूल, सडक-अर्जुनी तालुक्यातील जि.प.उच्च प्राथमिक शाळा बकी, देवरीची जि.प.हायस्कूल या शाळांची पुणे येथे आयोजित कार्यशाळेसाठी निवड करण्यात आली होती. यात गोरेगावची शहीद जान्या-तिम्या जि.प.हायस्कूलची निवड करण्यात आली. उर्वरीत ५ शाळांपैकी २ शाळांची तेजस शाळा म्हणून निवड होण्याची शक्यता आहे.सरकारतर्फे राज्यात शंभर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळा तयार केल्या जात आहेत. या शाळांत भौतिक, शैक्षणिक व मूलभूत सोयी सुविधा राहतील. गरीब विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळणार आहे. गोंदिया जिल्ह्यात ओजस शाळा निर्मितीमुळे शासकीय शाळांमध्ये स्पर्धा निर्माण होईल. एक ओजस शाळेच्या अधिन नऊ तेजस शाळा राहणार आहेत. जिल्ह्यात जास्तीत-जास्त तेजस शाळा तयार करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.- राजकुमार हिवारे प्राचार्य,जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था,