शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

११ हजार हेक्टरवर दुष्काळाची छाया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 22:00 IST

तालुक्यात १५ हजार हेक्टरवर खरीपात धानपिकाची लागवड करण्यात आली. मात्र कमी पाऊस आणि कीडरोगांमुळे यापैकी ११ हजार हेक्टरमधील पिके पूर्णपणे नष्ट झाली आहेत.

ठळक मुद्देपिकांवरील रोगांमुळे शेतकरी हैराण : शासनाच्या घोषणेकडे लक्ष

विजय मानकर।लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : तालुक्यात १५ हजार हेक्टरवर खरीपात धानपिकाची लागवड करण्यात आली. मात्र कमी पाऊस आणि कीडरोगांमुळे यापैकी ११ हजार हेक्टरमधील पिके पूर्णपणे नष्ट झाली आहेत. त्यामुळे तालुक्यात दुष्काळसदृश्य स्थिती निर्माण झाली असून शेतकºयांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.तालुक्यात एकूण १७ हजार ७३९ हेक्टर क्षेत्र लागवडयोग्य आहे. त्यापैकी १५ हजार हेक्टरपेक्षा जास्त जमिनीवर धानाची शेती केली जाते. याच पिकावर या परिसरातील शेतकºयांचा वर्षभराचा उदरनिर्वाह चालतो. शेतीशिवाय या तालुक्याला अर्थाजन करण्याचे कोणतेही दुसरे माध्यम नाही. मात्र यंदा कमी पाऊस आणि कीडरोगांमुळे ११ हजार हेक्टरमधील धानाची अक्षरश: तणस झाली आहे. त्यामुळे ऐवढ्या क्षेत्रावर शुन्य उत्पादनाची शक्यता वर्तविली जात आहे.यंदा खरीप हंगामात सुरुवातीपासून पावसाने दगा दिला. त्यामुळे धानाची पेरणी आणि रोवणी वेळेवर होऊ शकली नाही. ऐन रोवणीच्या कालावधीत पावसाने पाठ फिरविली. त्यामुळे केवळ नैसर्गिक पावसावर अवलंबून असलेल्या शेतकºयांना रोवणी करता आली नाही. तालुक्यातील तीन सर्कलचा विचार केला तर कावराबांध परिसरात ९० टक्के रोवणी झाली. परंतु सालेकसा व साखरीटोला सर्कलमधील एकंदरीत ३५ ते ४० टक्के क्षेत्रावर रोवणी झाली नाही. ३० टक्के क्षेत्र पडीक राहिले. कावराबांध सर्कलमध्ये रोवणीची कामे ९० टक्के झाली मात्र पीक आल्यावर शेवटच्या क्षणी ऐन कापणीच्या १५ दिवसांपूर्वी मावा, तुडतुडा आणि खोडकीडा आदी कीडरोगांचा प्रादुर्भाव झाला. परिणामी पिकांचे ५० टक्यांपेक्षा जास्त नुकसान झाले. जवळपास साडेपाच हजार हेक्टर क्षेत्रावरील धानपीक कीडरोगांमुळे नष्ट झाले. सुरुवातीला ५ हजार हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्र पावसाअभावी पडीक राहिले. त्यामुळे यातून कुठलेच उत्पादन होणार नाही. एकंदरीत कमी पाऊस आणि कीडरोगांमुळे सालेकसा तालुक्यात दुष्काळसदृश्य स्थिती आहे.अकरा हजार हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्रावर काहीच उत्पादन होणार नसल्याने वर्षभर कुटुंबांचा उदरनिर्वाह करायचा कसा आणि सावरकार, बँकेच्या कर्जाची परतफेड कशी करायची याच चिंतेत शेतकरी आहेत. पावसाअभावी ३० टक्के शेतकºयांना रोवणीच करता आली नाही. त्यामुळे त्यांचा लागवड खर्च सुध्दा निघणार नसल्याचे चित्र आहे. पेरणीपासून रोवणीपर्यंत लागणारा खर्च, खत, औषध तसेच मजुरीचा खर्च नांगरणी खर्च आदीचा विचार केल्यास शेतकºयांच्या हाती काहीच लागणार नसून उलट कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे. तालुक्यातील पिकांची स्थिती लक्षात घेता शासनाने सालेकसा तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करुन शेतकºयांना आर्थिक मदत देण्याची मागणी होत आहे.लोकप्रतिनिधी लक्ष देणार का?नुकतेच जिल्हाधिकारी आणि स्थानिक आमदाराने काही गावांना भेट देऊन पिकांची पाहणी केली. याच दरम्यान जिल्ह्यातील तीन तालुक्यात मध्यम स्वरुपाचा दुष्काळ घोषित करण्यात आला. मात्र यामध्ये सालेकसा तालुक्याचा समावेश नव्हता. त्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधी याचा पाठपुरावा करुन शेतकºयांना मदत मिळवून देणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.शेतकरी, शेतमजूर रोजगाराच्या शोधातयंदा पावसाअभावी जिल्ह्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती आहे. केलेला लागवड खर्चसुध्दा भरुन निघण्याची शक्यता नाही. त्यामुळे शेतकºयांसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. वर्षभर कुटुंबाचा उदरनिर्वाह करता यावा, यासाठी तालुक्यातील अनेक शेतकरी, शेतमजूर रोजगाराच्या शोधात शहराकडे पलायन करीत असल्याचे चित्र आहे.शेतकºयांनी मांडल्या व्यथातालुक्यात दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर लोकमत प्रतिनिधीने तालुक्यातील अनेक गावात संपर्क अभियान राबवून शेतकºयांशी थेट संवाद साधला. यावेळी अनेक शेतकºयांनी प्रत्यक्षात शेती दाखवत आपली व्यथा मांडली. आधी पावसाने आणि आता कीडरोगांमुळे शेतकºयांच्या हाती केवळ तणसच येणार असल्याचे सांगितले. तालुक्यातील बिंझली, कावराबांध, झालीया, कोटजमुरा, नवेगाव, बाम्हणी, खेडेपार, खोलगड, पानगाव, दरबडा, धानोली, सातगाव, तिरखेडी, गिरोला, बोदलबोडीसह अनेक गावांत प्रत्यक्ष भेट देऊन धानपिकांची पाहणी केली. त्यात अनेक गावांमध्ये अतिशय बिकट स्थिती आढळली.ज्या शेतात सरासरी २५० पोती धान उत्पादन होत होते, त्या शेतात यंदा जेमतेम पाच पोती धानाचे उत्पादन झाले. ते देखील खाण्यायोग्य नाही. जनावरांचा चारा म्हणून तणससुध्दा उपयोगाची नाही. त्यामुळे जनावरांच्या चाºयाचा सुध्दा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.- पुल्लुलाल दमाहे, नवेगाव (शेतकरी)दरवर्षी येणाºया नैसर्गिक संकटामुळे शेतकºयांची अवस्था बिकट झाली आहे. यंदा तर शेतीतून काहीच उत्पन्न हाती येण्याची शक्यता नाही. त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, हीच चिंता आतापासून सतावत आहे.- झनकलाल नागपुरे (शेतकरी)