शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

पिण्याच्या पाण्याची भीषण समस्या

By admin | Updated: March 9, 2017 00:41 IST

पंचायत समिती सडक अर्जुनी व कन्हारपायली ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या पातरगोटा येथे पिण्याच्या पाण्याची भीषण समस्या निर्माण झाली आहे.

प्रशासनाचे दुर्लक्ष : पातरगोटा येथे बोअरवेलची मागणी शेंडा (कोयलारी) : पंचायत समिती सडक अर्जुनी व कन्हारपायली ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या पातरगोटा येथे पिण्याच्या पाण्याची भीषण समस्या निर्माण झाली आहे. याची माहिती जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी व पाणी पुरवठा विभागाच्या मुख्य अभियंत्याला गावकऱ्यांच्या सह्यानिशी लेखी निवेदनातून देण्यात आली. मात्र त्याची दखल आजपावेतो घेण्यात आली नाही. त्यामुळे गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्याच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. कन्हारपायली पासून २ किमी अंतरावर असलेल्या पातरगोटा येथे ३० ते ३५ घरांचे आदिवासी समाजाचे लोक पिढ्यानपिढ्यापासून वास्तव्यास आहेत. पातरगोटा हे गाव आदिवासीबहुल असून अतिदुर्गम नक्षल क्षेत्रात मोडते. त्या गावात फक्त एकच बोअरवेल आहे. त्यामुळे गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत नाही. एक किमी अंतरावरुन शेतातील विहिरींचे पाणी आणूण तहान भागवावी लागते. पाणी समस्या दूर करण्यासाठी गावकऱ्यांनी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, पाणी पुरवठा विभागाचे मुख्य अभियंता व ग्रामपंचायतकडे वारंवार कैफियत मांडली, तरीही दुर्लक्ष करण्यात आले. पिण्याचे पाणी, रस्ते व वीज या मानवाच्या मुलभूत गरजा असून त्याची पूर्तता करणे प्रशासनाचे आद्यकर्तव्य आहे. असे असताना त्याकडे दुर्लक्ष केल्या जाते, ही शोकांतिका आहे. अखेर गावकऱ्यांनी या क्षेत्राचे जि.प. सदस्य सरिता कापगते यांना निवेदन देऊन पिण्याच्या पाण्याची समस्या मांडली. यावर त्यांनी तातडीने पातरगोटा गावाला भेट देवून पाणी समस्या जाणून घेतली व लवकरच बोअरवेलची मागणी करुन पाणी समस्या दूर केल्या जाईल, असे आश्वासन गावकऱ्यांना दिले. (वार्ताहर)