शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

बलात्कारप्रकरणी सात वर्षाची शिक्षा

By admin | Updated: September 13, 2014 01:59 IST

तेंदूपत्ता तोडून घरी परतलेल्या ईस्तारी येथील ३५ वर्षाच्या महिलेवर गडचिरोली जिल्ह्यातील ४५ वर्षाच्या एका इसमाने बलात्कार केला होता.

गोंदिया : तेंदूपत्ता तोडून घरी परतलेल्या ईस्तारी येथील ३५ वर्षाच्या महिलेवर गडचिरोली जिल्ह्यातील ४५ वर्षाच्या एका इसमाने बलात्कार केला होता. या प्रकरणातील आरोपीला जिल्हा सत्र न्यायालयाने बुधवारी सात वर्षाची शिक्षा सुनावली आहे. भाऊदास केवलराम सहारे (४५) रा. कारूटोला तालुका कोरची जि. गडचिरोली असे आरोपीचे नाव आहे. इस्तारी येथील ३५ वर्षाची महिला १८ मे २०११ रोजी सकाळी ७ वाजता दरम्यान तेंदूपत्ता तोडण्यासाठी मुलगा, वडील यांच्या सोबत जंगलात गेली होती. जंगलातून घरी परतल्यावर दुपारी १.३० वाजताच्या सुमारास त्यांच्या घरी एक अनोळखी इसम आला. त्याने पिण्याचे पाणी मागितले. त्याच्यासाठी पाणी आणण्यासाठी ती महिला घरात गेली असता आरोपी तिच्या मागे-मागे घरात गेला. तिच्यावर बळजबरीचा प्रयत्न करीत असताना ती ओरडली. त्यावर तिचा मुलगा मदतीसाठी धावला. मात्र आरोपी भाऊदास सहारे हा पीडित महिलेच्या मुलाला मारण्यासाठी धावल्याने तो मुलगा पळाला. त्यानंतर आरोपीने त्या महिलेला तणशीच्या ढिगात नेऊन तिच्यावर बलात्कार केला. घराबाहेर पळालेल्या तिच्या मुलाने शेजाऱ्यांना बोलावून आणले. तेव्हापर्यंत आरोपीने त्या महिलेची आब्रु लुटली होती. गावकऱ्यांनी त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. या घटनेची साक्ष पीडित महिलेचा मुलगा व गावकऱ्यांनी दिली. या प्रकरणात प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश गिरटकर यांनी बुधवारी सुनावणी केली. या प्रकरणातील आरोपी भाऊदास सहारे याला कलम ३७६ नुसार चार वर्षाची शिक्षा व एक हजार रूपये दंड, दंड न भरल्यास एक महिन्याची शिक्षा, कलम ५०६ नुसार ३ वर्षाची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणात सरकारी वकील अ‍ॅण्ड. कैलास खंडेलवाल यांनी काम पाहिले. या प्रकरणातील पीडित महिलेने घटनेच्या १७ दिवसानंतर स्वत:च्या अंगावर रॉकेल ओतून आत्महत्या केली. (तालुका प्रतिनिधी)