शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

सात तालुके आता ‘अंडर फिफ्टी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2022 05:00 IST

डिसेंबर महिन्याच्या शेवटपासून कोरोनाची तिसरी लाट आपला जोर दाखवू लागली होती व त्याचे पडसाद जिल्ह्यातही दिसले. नियंत्रणात असलेली कोरोनाबाधितांची संख्या अचानकच वाढू लागली. जानेवारी महिन्यात बाधितांची संख्या झपाट्याने वाढत गेली व हा आकडा ३०० वर गेला होता. त्या काळात ॲक्टिव्ह रुग्ण संख्याही २००० च्या घरात आली होती. दिलासादायक बाब म्हणजे, तिसऱ्या लाटेतील विषाणू कमकुवत असल्याने बाधितांपेक्षा मात करणाऱ्यांची संख्या जास्त होती.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : तिसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव आता ओसरू लागला असून, जिल्ह्यातून कोरोनाचा परतीचा प्रवास सुरू झाल्याचे दिसत आहे. कारण, ३०० वर गेलेली बाधितांची संख्या आता ५० च्या आत आली आहे. शिवाय, कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या जास्त असल्याने जिल्ह्यातील सात तालुके आता ‘अंडर फिफ्टी’मध्ये आले आहेत. कोरोनामुक्तीच्या दिशेने त्यांची वाटचाल सुरू झाल्याचे दिसत आहे. डिसेंबर महिन्याच्या शेवटपासून कोरोनाची तिसरी लाट आपला जोर दाखवू लागली होती व त्याचे पडसाद जिल्ह्यातही दिसले. नियंत्रणात असलेली कोरोनाबाधितांची संख्या अचानकच वाढू लागली. जानेवारी महिन्यात बाधितांची संख्या झपाट्याने वाढत गेली व हा आकडा ३०० वर गेला होता. त्या काळात ॲक्टिव्ह रुग्ण संख्याही २००० च्या घरात आली होती. दिलासादायक बाब म्हणजे, तिसऱ्या लाटेतील विषाणू कमकुवत असल्याने बाधितांपेक्षा मात करणाऱ्यांची संख्या जास्त होती. परिणामी, जिल्ह्यात अव्यवस्था झाली नाही. आता मात्र तिसरी लाट ओसरू लागली असल्याचे दिसत आहे. कारण, बाधितांचा आकडा आता ५० पेक्षाही कमी झाल्याचे मागील ४-५ दिवसांत बघावयास मिळत आहे. विशेष म्हणजे, बाधितांची संख्या कमी व मात करणारे त्यापेक्षा दुप्पट- तिप्पट असे समीकरण झाल्याने सध्या जिल्ह्यात फक्त १६४ ॲक्टिव्ह रुग्ण उरले आहेत. यामध्ये तब्बल सात तालुक्यांतील ॲक्टिव्ह रुग्णसंख्या ५० च्या आता असून, पाच तालुक्यांतील संख्या २० च्या आत आहे. एकंदर त्यांची कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरू असून अशीच स्थिती असल्यास येत्या २-४ दिवसांत काही तालुके नक्कीच कोरोनामुक्त होणार, यात शंका वाटत नाही. मात्र, गोंदिया तालुक्यात सर्वाधिक ६२ रुग्ण आहेत.

८१२ चाचण्यांत फक्त १४ बाधित- जिल्ह्यातून कोरोना आता आपला काढता पाय घेत असल्याने दिलासा मिळाला आहे. त्यात बाधितांची संख्या कमी असल्याने ‘सोने पे सुहागा’ झाला आहे. शनिवारी जिल्ह्यात ८१२ चाचण्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये २५६ आरटी-पीसीआर, तर ५५६ रॅपिड ॲंटिजन असून फक्त १४ पॉझिटिव्ह आल्या आहेत. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या