शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
5
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
6
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
7
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
8
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
9
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
10
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
11
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
12
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
13
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
14
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
15
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
16
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
17
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
18
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
19
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
20
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
Daily Top 2Weekly Top 5

सात महिन्यात एकाही घरकुलाचे काम पूर्ण नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2019 06:00 IST

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत देशभरात प्रधानमंत्री आवास उभारण्यात येत आहे. महाराष्ट्रात सन २०१९-२० या वर्षात १ लाख ५१ हजार ४८ आवासांना मंजुरी देण्यात आली. परंतु राज्य सरकारच्या योजनेतून फक्त १४ आवास मंजूर करण्यात आले. मंजूर आवासापैकी २४ हजार १४४ आवासांची कामे सुरू करण्यात आले.

ठळक मुद्देप्रधानमंत्री आवास योजना : ३४६५ कामांना मंजुरी; मात्र कामाला सुरुवात नाही

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : केंद्र सरकारचे २०२२ पर्यंत प्रत्येक व्यक्तीला स्वत:चे घर असावे यासाठी प्रयत्न सुरू आहे. परंतु मागील सात महिन्यात एकाही घरकुलाच्या कामाला सुरूवात झाली नसल्यामुळे सन २०१९-२० या वर्षाच्या सात महिन्यात एकाही घरकुलाचे काम पूर्ण होऊ शकले नाही. यावर्षी ३ हजार ४६५ आवासांना मंजुरी मिळाली परंतु एकाही कामाला सुरूवात झाली नाही.महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत देशभरात प्रधानमंत्री आवास उभारण्यात येत आहे. महाराष्ट्रात सन २०१९-२० या वर्षात १ लाख ५१ हजार ४८ आवासांना मंजुरी देण्यात आली. परंतु राज्य सरकारच्या योजनेतून फक्त १४ आवास मंजूर करण्यात आले. मंजूर आवासापैकी २४ हजार १४४ आवासांची कामे सुरू करण्यात आले. तर १३५७ आवासांची कामे पूर्ण झाली आहेत.राज्य सरकारच्या योजनेंतर्गत मंजूर आवासांपैकी फक्त ४ आवासांची कामे सुरू आहेत. गोंदिया जिल्ह्यात यावर्षी ३ हजार ४६५ आवासांना मंजुरी देण्यात आली.यापैकी फक्त ६० आवासांची कामे सुरू आहेत.परंतु आतापर्यंत एकाही आवासांचा काम सुरू झाले नाही. जिल्ह्यात राज्य सरकारच्या योजनेंतर्गत ११ आवास मंजूर करण्यात आले आहे. यापैकी २ आवासांची कामे सुरू आहेत. जिल्ह्यात मंजूर आवासांमध्ये आमगाव ३१३, अर्जुनी मोरगाव १८, देवरी ६१३, गोंदिया १७८१, गोरेगाव १९०, सडक-अर्जुनी २, सालेकसा २२८, तिरोडा ३२० आवासांचा समावेश आहे. या मंजूर असलेल्या आवासांपैकी देवरीत ८, गोंदिया ४२, गोरेगाव ७, सालेकसा ३ आवासांची कामे सुरू आहे. यापैकी एकही आवासाची कामे पूर्ण झाली नाही. राज्य सरकारच्या योजनेंतर्गत अर्जुनी-मोरगावात १० तसेच गोरेगावात १ आवासाला मंजुरी देण्यात आली. यात अर्जुनी-मोरगाव मध्ये २ आवासाची काम सुरू आहेत. जिल्ह्यात सन २०१८-१९ वर्षात २०४८ आवासांना मंजुरी देण्यात आली. यातील १४४८ आवासांची कामे सुरू आहेत. १४२९ आवासांची कामे पूर्ण झाली आहेत. यावर्षी आमगाव १४३, अर्जुनी-मोरगाव ४८७, देवरी ३२८,गोंदिया ४३६, गोरेगाव ९९, सडक-अर्जुनी १०८, सालेकसा १४९, तिरोडा २९८ मंजूर आवासांचा समावेश आहे. आमगावात १३२, अर्जुनी-मोरगाव १५३, देवरी १५१, गोंदिया ४७४, गोरेगाव १३५, सडक-अर्जुनी ८०, सालेकसा १२४, तिरोडा १९९ आवासांची कामे सुरू आहेत.१४२९ आवासांची कामे पूर्णजिल्ह्यात सन २०१८-१९ मध्ये मंजूर आवासांपैकी १४२९ आवासांची कामे पूर्ण झालीत. परंतु सन २०१९-२० मधील एकही आवासाचे काम पूर्ण होऊ शकले नाही. सन २०१८-१९ मध्ये आमगावातील २७, अर्जुनी-मोरगाव ७५, देवरी १७०, गोंदिया ४२२, गोरेगाव २२८, सडक-अर्जुनी १४४, सालेकसा २४०, तिरोडा १२३ आवासांची कामे पूर्ण झाली आहेत.

टॅग्स :Pradhan Mantri Awas Yojanaप्रधानमंत्री आवास योजना