शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

डुकरांच्या समस्येवर तोडगा निघेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 00:54 IST

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शहराच्या स्वच्छतेसाठी नगर परिषदेची धडपड सुरू आहे. यासाठी विविध उपक्रम राबवून शहरवासीयांत जनजागृती व शहर स्वच्छतेचे कार्य केले जात आहे.

ऑनलाईन लोकमतगोंदिया : स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शहराच्या स्वच्छतेसाठी नगर परिषदेची धडपड सुरू आहे. यासाठी विविध उपक्रम राबवून शहरवासीयांत जनजागृती व शहर स्वच्छतेचे कार्य केले जात आहे. असे असताना मात्र घाणीचे वाहक म्हटल्या जाणाऱ्या डुकरांच्या समस्येवर नगर परिषदेकडे काहीच तोडगा नसल्याचे दिसते. कारण, शहरातील डुकरांची समस्या दिवसेंदिवस अधीकच गंभीर होत चालली असून शहरवासी चांगलेच त्रासले आहेत.नगर परिषदेतील विरोधी पक्षातील सदस्यांनी उपाध्यक्षांच्या निवडीला घेऊन न्यायालयात धाव घेतली. न्यायालयीन प्रक्रीयेमुळे नगर परिषदेच्या कारभारावर परिणाम पडला. ही बाब लक्षात घेत न्यायालयाने जनहितार्थ विषयांवर कारवाई करण्याचे अधिकार मुख्याधिकाºयांना एका आदेशातून दिले. याच दरम्यान, नगराध्यक्षांनी २७ आॅक्टोबर रोजी विशेष सर्वसाधारण सभा बोलाविली होती. त्यात नगर परिषद क्षेत्रातील बेवारस डुकरांचा बंदोबस्त करण्याचा विषय मांडण्यात आला होता. पाच विषयांच्या या सभेत सर्वच विषयांना मंजुरी मिळाली होती.या सभेनंतर मुख्याधिकाऱ्यांनी टेमनी येथील जागेवर शहरातील डुकरांची व्यवस्था करण्यात येणार असे काही ठरविले होते. यात डुकर पालकांना त्यांचे डुकर तेथे हलवायचे होते व तेथेच पाळायचे असे काही ठरविण्यात आले होते. शिवाय शहरात निघणारा कचरा डुकरांना देण्याचा विचार होता. मात्र टेमनी येथील जागाच वांद्यात असल्याने मुख्याधिकाऱ्यांचा हा प्लान फसल्याचे वाटते. मात्र त्यानंतरही आता या विशेष सभेला चार महिन्यांचा कालावधी लोटला असताना डुकरांच्या विषयावर काहीच हालचाल होत असताना दिसत नाही. परिणामी दिवसेंदिवस डुकरांची संख्या वाढतच चालली असून ही समस्या अधीकच गंभीर होताना दिसत आहे.डुकरांची समस्या सुटत नसल्यामुळे आजघडीला शहरातील प्रत्येकच भागात डुकरांचे कळप बघावयास मिळतात. ‘बघावे तेथे डुकर’ अशी आजची स्थिती असून आतातर लोकांच्या घरात डुकर शिरू लागले असे चित्र निर्माण झाले आहे. शिवाय रस्त्याने जाताना कधी डुकर आडवे येणार याचा काही नेम नसून यातूनच कित्येकदा अपघातही घडले आहेत.हे सर्व होत असताना नगर परिषद प्रशासनाकडून काहीच पाऊल उचलले जात नसल्याने शहरवासीयांत रोष खदखदत आहे. मात्र नगर परिषद कोठेतरी कमकुवत पडत असल्यामुळे डुकरांच्या समस्येवर काही तोडगा निघत नसल्याचे चित्र आहे.यापूर्वीही प्रयोग फसलातत्कालीन मुख्याधिकारी सुमंत मोरे येथे असताना त्यांनी नाशिक येथील डुकर पकडणाऱ्यांचे पथक बोलाविले होते. मात्र येथील डुकर पालकांनी त्यांच्याशी वाद घातल्याने तेही येथून परत गेले होते. ते परत गेल्याने मोरे यांनी हाती घेतलेला प्रयोग फसला होता. त्यानंतर कुणीही या विषयात हात घातला नाही. परिणामी आता एवढ्या काळात डुकरांची समस्या अधीकच गंभीर झाली आहे. नगराध्यक्षांनी विशेष सभेत डुकरांचा विषय मांडून त्याला सर्व सदस्यांनी मंजुरी दिली. आता डुकरांच्या या गंभीर समस्येवर मुख्याधिकारी काय तोडगा काढतात हे बघायचे आहे. मुख्याधिकाऱ्यांना न्यायालयाने अधिकार दिल्याने त्यांनीच आता काही हालचाल करावी अशी अपेक्षा शहरवासी बाळगून आहेत.