शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
4
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
5
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
6
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
7
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
8
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
9
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
10
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
11
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
12
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
13
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
14
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
15
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
16
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
17
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
18
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
19
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
20
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!

३३ व्या सामूहिक विवाह सोहळ्याची सांगता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2016 01:34 IST

यावर्षी युवा कुणबी संघटनेद्वारे कुणबी समाजाचा ३३ वा सामूहिक विवाह सोहळा रविवारी हिंदी टाऊन शाळेच्या पटांगणात पार पडला.

युवा कुणबी समाज संघटन : रमेश कुथे यांच्या मार्गदर्शनात ३३ वर्षांची परंपरांगोंदिया : यावर्षी युवा कुणबी संघटनेद्वारे कुणबी समाजाचा ३३ वा सामूहिक विवाह सोहळा रविवारी हिंदी टाऊन शाळेच्या पटांगणात पार पडला. ३३ वर्षापासून चालत येणारा हा विवाह सोहळा पुढेही चालत राहणार आहे. याप्रसंगी मीरा बेदर व बेदरे यांनी लग्न संस्कार व सप्तपदीची प्रथा पार पाडली. परंपरेनुसार नारायण बहेकार यांच्या वाणीतून मंगलाष्टकांसोबत कार्यक्रम झाले.बँड वाजा व पटाख्यांच्या आतिशबाजीने वरात शहराच्या मुख्य मार्गाने शिवसेना कार्यालयासमोर हिंदी टाऊन शाळेत विवाहस्थळी आली. कुणबी संघटनेचे महिला-पुरूष कार्यकर्ते व वधू पक्षांद्वारे वर व सर्व पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. संत तुकाराम महाराज व वीर राजे चिमणा बहादूर गोविंद बहेकार यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी युवा कुणबी संघटनेचे अध्यक्ष रमेश कुथे, दूध संघाचे अध्यक्ष राजकुमार कुथे, निलकंठराव ब्राह्मणकर, लिलाधर पाथोडे, बी.आर. दिवाळे, दुलिचंदराव बुद्धे, डॉ. प्रकाश धोटे, विजय बहेकार, राजेश चतुर, अमर वऱ्हाडे, सी.के. ठाकरे, शैलेश फुंडे, मोहन बुढेकार, गणेश हेमणे, सुनिता तरोणे, सविता भुरले, नंदा राऊत, अभियंता महारवाडे, महादेव मेंढे, एन.के. नखाते, आनंदराव वाढई, चंदनलाल ठाकूर, बंडू चामट, आठवले, चुन्नी बेंदरे, मोरेश्वर कुथे उपस्थित होते. या वेळी वर-वधूंच्या पालकांचा सत्कार रमेश कुथे यांच्याद्वारे करण्यात आले.मंडप डेकोरेशन व वर-वधू पक्षाच्या पाहुण्यांची थांबण्याची व जेवणाची व्यवस्था, नास्ता, छाछ, आईस गोला, पॉपकार्न व शीतल जलाची व्यवस्था रमेश कुथे कुटुंबीयांकडून नि:शुल्क करण्यात आली. युवा कुणबी संघटनेकडून वर-वधूंना लग्न प्रमाणपत्र व भेटवस्तू देण्यात आले. संजय भेंडारकर यांनी सर्व नवदाम्पत्यांना स्टँड फॅन भेट दिले.सदर सामूहिक विवाह सोहळ्यात जळगाव ते गोंदियापर्यंत तसेच छत्तीसगडचे दुर्ग व मध्य प्रदेशाचे लामता, रजेगाव, बालाघाट जिल्ह्यातील नवदाम्पत्यांचा समावेश होता. समाजाला एकजुट करण्याच्या हेतूने व समाजाला अकारण खर्चातून वाचविण्यासाठी रमेश कुथे यांच्या नेतृत्वात ३३ वर्षांपासून या शुभमंगल सामूहिक विवाह सोहळ्याची परंपरा कायम आहे. संचालन गजेंद्र फुंडे यांनी केले. आभार राजकुमार कुथे यांनी मानले. कार्यक्रमासाठी प्रशांत ठवकर, हिमांशू कुथे, दिनेश बहेकार, मुन्ना बहेकार, कैलाश तावाडे, हेतराम हेमणे, सुधीर बागडे, गजेंद्र बांते, स्वप्नील ढबाले, रमेश देशमुख, भूषण फुंडे, रूपेश निंबार्ते, महेश हलमारे, टिकेश बोहरे, सदु पारधी, प्रकाश बुरडे, संतोष मुनेश्वर, डॉ. विवेक मेंढे, प्रल्हाद सार्वे, शैलेश अहिरकर, प्रकाश पाथोडे, लखन मेंढे, निखिल भांडारकर, जी.आय. फुंडे, सुनील देशमुख, मनिष कुकडे, महेंद्र देशमुख, बंशीधर शहारे, सुखदेव तावाडे, चंद्रकांत चुटे, अ‍ॅड. अजय फेंडारकर, प्रशांत कोरे, नितीन फुंडे, राकेश हत्तीमारे, राजू तावाडे, राजू ठाकरे, सुहास झाडे, निलेश बहेकार, मंगेश बुढेकर, महेश वैद्य, नामदेव रहिले, छोटू पंचबुद्धे, चंद्रकांत तरोणे, पडोल यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)