शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी युद्ध सोडवण्यात तज्ज्ञ..." पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमा वादावर ट्रम्प यांचं भाष्य!
2
अभ्यासाला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, असं आहे वेळापत्रक 
3
राज्यासमोर मोठं संकट! जगभरात थैमान घालणाऱ्या आजाराचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ
4
SA W vs BAN W : निर्णायक षटकात अख्तरची धुलाई; रंगतदार सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं मारली बाजी
5
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकत्रित लढणार!
6
४८ तासात 'सोनेरी सफर'च्या दोन घटना उघड , रेल्वेच्या तपास यंत्रणा खडबडून जाग्या 
7
डिस्काउंटचा धमाका! १० हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळतायेत 'हे' जबरदस्त फोन
8
६००० रुपयांचा बोनस आणि...; एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी तिप्पट गोड!
9
Video: आधी कानाखाली मारल्या, नंतर धरली मान; मॅच सुरू असतानाच स्टेडियमध्ये 'बाई, काय हा प्रकार'
10
ठाणे-वसईकरांचे हाल! घोडबंदर मार्गावर चार-चार तास वाहतूक कोंडी
11
पाकिस्तानात शरणार्थी, मशिदीतून शिक्षणाची सुरुवात; तालिबानी परराष्ट्रमंत्री मुत्ताकी किती शिक्षित आहेत? जाणून घ्या...
12
ईतवारी एक्सप्रेसमध्ये सापडले सोन्याचे घबाड, एकाला अटक; साडेतीन कोटींचे सोने जप्त!
13
उल्हासनगर भाजपाकडून पाणी टंचाई विरोधात मोर्चा; योगेश म्हात्रे यांच्याकडून आत्महत्येचा प्रश्न 
14
"शेतकरी पॅकेज, कर्जमाफी, लाडकी बहीण या मुद्द्यांवर  महायुती सरकारकडून जनतेची फसवणूक’’, रमेश चेन्नीथला यांचा आरोप
15
"डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळावा म्हणून आम्ही..."; इस्रायलचे PM बेंजामिन नेतन्याहूंनी मानले ट्रम्प यांचे आभार
16
तेज प्रताप यादव यांनी २१ जागांवर उमेदवार उभे केले; स्वतः या जागेवरून निवडणूक लढवणार
17
अरे देवा हे काय, विद्यार्थ्यांच्या बॅगमध्येच कोयते-चॉपर! नाशिकमधील भाईगिरीचे 'फॅड' शाळेपर्यंत
18
मुंबईत ठाकरे बंधूंसोबत लढायचं की स्वतंत्रपणे? काँग्रेसच्या नेत्यांनी हायकमांडकडे केली अशी मागणी
19
सात दिवस उलटूनही IPS पूरन कुमार यांच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम नाही; पत्नीने केली मोठी मागणी...
20
‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ योजना बंद झाल्याची चर्चा? शालेय शिक्षण विभागाने दिली अशी माहिती

सप्टेंबर महिना कोरोना ब्लास्टचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2020 05:00 IST

जिल्ह्यात २७ मार्चला पहिला कोरोना बाधित रूग्ण आढळला होता. त्यानंतर जवळपास दीड महिना एकही कोरोना बाधिताची नोंद झाली नव्हती. तर मार्च ते जुलै या पाच महिन्याच्या कालावधीत २८८ कोरोना बाधित आढळले. तर ऑगस्ट महिन्यात ११९३ कोरोना बाधितांची नोंद झाली. त्यामुळे ऑगस्ट महिना कोरोना उद्रेकाचा ठरला. त्यानंतर सप्टेंबर महिन्यापासून कोरोना बाधितांची संख्या आटोक्यात येईल असा अंदाज वर्तविला जात होता.

ठळक मुद्दे९ दिवसात १७ बाधितांचा मृत्यू : १११८ कोरोना बाधित, शहराला विळखा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : सध्या सर्वत्र कोरोना प्रादुर्भाव वाढत असून शहरी भागात वेगाने संसर्ग होत आहे. सप्टेंबर महिन्याच्या सुरूवातीपासून जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. १ ते ९ सप्टेंबर दरम्यान १७ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला असून मागील सहा महिन्यातील हा सर्वाधिक आकडा आहे. तर १११८ कोरोना बाधितांची नोंद झाली आहे.त्यामुळे सप्टेंबरमध्ये जिल्ह्यात कोरोनाचा ब्लास्ट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोरोना बाधितांच्या आकड्याचा नवा विक्रम होण्याची शक्यता आहे.जिल्ह्यात २७ मार्चला पहिला कोरोना बाधित रूग्ण आढळला होता. त्यानंतर जवळपास दीड महिना एकही कोरोना बाधिताची नोंद झाली नव्हती. तर मार्च ते जुलै या पाच महिन्याच्या कालावधीत २८८ कोरोना बाधित आढळले. तर ऑगस्ट महिन्यात ११९३ कोरोना बाधितांची नोंद झाली. त्यामुळे ऑगस्ट महिना कोरोना उद्रेकाचा ठरला. त्यानंतर सप्टेंबर महिन्यापासून कोरोना बाधितांची संख्या आटोक्यात येईल असा अंदाज वर्तविला जात होता. मात्र सप्टेंबर महिन्यात दररोज शंभर कोरोना बाधितांची भर पडत असून १ ते ९ सप्टेंबर दरम्यान १११८ कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. तर १७ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.कोरोना बाधितांच्या मृत्यूच्या आकड्यात वाढ होत असल्याने जिल्हावासीयांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढीचा वेग चौपट झाला आहे. विशेष म्हणजे सर्वाधिक कोरोना बाधित हे गोंदिया शहरात आढळले असून रुग्ण संख्या दीड हजारावर गेली आहे.त्यामुळे संपूर्ण गोंदिया शहरच कोरोनाच्या विळख्यात आल्याचे चित्र आहे. त्यामुळे शहरवासीयांना वेळीच सावध होण्याची गरज असून आरोग्य विभागाने दिलेल्या दिशा निर्देशांचे काटेकोरपणे पालन करुन स्वत:ची आणि आपल्या कुटुंबांची काळजी घेण्याची गरज आहे.दर १४ तासाला एका बाधिताचा मृत्यूकोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून मृतकांच्या संख्येत सुध्दा झपाट्याने वाढ होत आहे. नऊ दिवसात १७ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला असून दर १४ तासाला एका कोरोना बाधिताचा मृत्यू होत असल्याचे चित्र आहे.मेडिकलचा दुर्लक्षितपणा भोवतोयजिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत असल्याने चाचण्यांचे प्रमाण सुध्दा वाढले आहे. कोरोनाची चाचणी करण्यासाठी नागरिक मेडिकलमध्ये जात आहे. मात्र या ठिकाणी स्वॅब नमुने कुठे घेतले जातात, या केंद्राकडे जाण्याचा मार्ग कोणता यासंबंधी कुठलेच माहिती फलक लावण्यात आलेले नाही. त्यामुळे तपासणीसाठी जाणाऱ्या अर्धा तास चाचपडत राहावे लागते. तर स्वॅब नमुने तपासणीठी या केंद्रासमोर रांग लागत असून यात अँटीजेन टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आलेले रुग्ण सुध्दा असतात. त्यामुळे सुध्दा कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. पण याकडे मेडिकलच्या व्यवस्थापनाचे दुर्लक्ष झाले आहे.कर्मचाऱ्यांअभावी केवळ दोन तास तपासणी४कोरोनाचा संसर्ग वाढत असताना मेडिकलचा अनागोंदी कारभार सुध्दा पुढे येत आहे. मनुष्य बळाचा अभाव असल्याने मेडिकलच्या स्वॅब नमुने तपासणी केंद्रात केवळ दोन तास स्वॅब नमुने घेतले जात असल्याची माहिती आहे. स्वॅब नमुने घेणाऱ्या आठ कर्मचाऱ्यांनाच कोरोनाची लागण झाली असल्याने ही समस्या निर्माण झाली आहे. परिणामी तपासणीसाठी येणाºया अनेकांना आल्या पावलीच परत जावे लागत असल्याचे चित्र आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या