शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
3
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
7
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
8
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
9
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
10
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
11
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
12
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
13
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
14
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
15
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
16
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
17
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
18
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
19
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
20
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

विनयभंगाचा दोषारोप २४ तासांत पाठवा

By admin | Updated: December 14, 2015 02:14 IST

महिलांच्या विनयभंगाची प्रकरणे घडण्याचे प्रमाण वाढत आहे. परंतु या प्रकरणातील दोषारोप पत्र न्यायालयात पाठवितांना उशीर होत असल्याने आरोपी मोकाट सुटतात.

पोलीस महासंचालकाची आढावा बैठक: पोलिसांना दिले तत्परतेचे आदेशगोंदिया : महिलांच्या विनयभंगाची प्रकरणे घडण्याचे प्रमाण वाढत आहे. परंतु या प्रकरणातील दोषारोप पत्र न्यायालयात पाठवितांना उशीर होत असल्याने आरोपी मोकाट सुटतात. साक्षीदारही बदलतात व सर्व खापर पोलिसांवर फोडले जाते. विनयभंगाच्या प्रकरणातील आरोपींना शिक्षा व्हावी यासाठी अशा प्रकरणांचा दोषारोप घटनेच्या २४ तासांच्या आत न्यायालयात सादर करा त्यामुळे आरोपींना शिक्षा होण्याचे प्रमाण वाढेल, असे आदेश पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी दिले.हिवाळी अधिवेशनासाठी नागपूर येथे आले असताना शनिवार व रविवार दोन दिवस गोंदिया जिल्ह्यात घालवून त्यांनी आढावा बैठक घेतली. सर्व पोलीस अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेऊन त्यांनी गोंदिया जिल्ह्यासंदर्भात महत्वपुर्ण सूचना दिल्या. याप्रसंगी त्यांनी, सायबर क्राईम करण्यात विद्यार्थी वर्ग पुढे येत आहे त्यासाठी शाळा- महाविद्यालयात सायबर क्राईम संदर्भात मेळावे घेऊन त्याचे दुष्परिणाम विद्यार्थ्यांना समजावून द्या, एससी-एसटींचे मेळावे घ्या व त्यात त्यांच्या समस्या जाणून घ्या, महिला बचत गटांची बैठक घ्या, गावागावात पोलीसमित्र तयार करा, पेट्रोलिंग घालताना त्यांची मदत घ्या, महिला अत्याचार, लहान मुले व जेष्ठांच्या समस्या वाढल्या असून त्यांच्याकडे विशेष लक्ष द्या, महिलांची तक्रार नोंदवितांना आॅन कॅमेरा त्यांचे बयाण नोंदवावे, घटनास्थळाचे पंचनामे करताना व्हीडीओ शुटींग करा, प्रत्येक गुन्ह्याचा जलदगतीने तपास करा, पोलिसांच्या कामात पारदर्शता यावी यासाठी एफआयआर त्वरीत तक्रारकर्त्यास व्हॉट्सअ‍ॅपवर उपलब्ध करा, ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्ह च्या आरोपींवर कडक कारवाई करा, पोलिस विभागात व्यसनी असलेल्या पोलिसांना व्यसनमुक्त करण्यासाठी कार्यशाळा घ्या, पोलिसांच्या अपंग मुलांना मदत करा, पोलिसांच्या गुणवंत मुलांना प्रोत्साहन द्या अशा विविध सूचना दिल्या. या बैठकीत पोलीस अधिक्षक शशीकुमार मीना, अप्पर पोलीस अधीक्षक संदीप पखाले, पोलीस उपअधीक्षक (गृह) सुरेश भवर, गोंदियाचे उपविभागीय पोलिस अधिकारी रामदास राठोड, तिरोडाचे देवीदास ईलमकर, आमगावच्या दीपाली खन्ना, एलसीबीचे पोलीस निरीक्षक जयराज रणवरे, नक्षल विरोधी अभियानचे पोलीस निरीक्षक संजीव गावडे व इतर पोलिस अधिकारी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)गोठणगावात ऐकल्या जवानांच्या समस्या रविवारी गोठणगाव येथे पोलीस जवानांची सभा घेऊन त्यांच्या समस्या दिक्षीत यांनी जाणून घेतल्या. सोबतच नक्षलवाद्यांचा नायनाट कसा करता येईल यासंदर्भात काही टिप्स त्यांनी दिल्या. नक्षलवाद्यांशी लढा देताना काय अडचणी आहेत ते जाणून त्यावर त्वरीत उपाय सूचविले. कर्मचाऱ्यांनी सांगितलेल्या सर्व समस्यांचे निराकरण यावेळी करण्यात आले. यावेळी गोंदिया जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकारी उपस्थित होते.