शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

सेनेच्या आंदोलनकर्त्यांना अटक-सुटका

By admin | Updated: August 3, 2016 00:19 IST

सरकारने शेतकरी व सामान्य जनतेची दिशाभूल केली. याशिवाय सोंड्याटोला उपा सिंचन प्रकल्पाला शासनाच्या दिरंगाईचा फटका

प्रकरण सिहोऱ्यात रास्ता रोको आंदोलनाचे : २६ आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल चुल्हाड (सिहोरा) : सरकारने शेतकरी व सामान्य जनतेची दिशाभूल केली. याशिवाय सोंड्याटोला उपा सिंचन प्रकल्पाला शासनाच्या दिरंगाईचा फटका बसला असता शिवसेना कार्यकर्त्यांनी सिहोऱ्यात रास्ता रोको व जेलभरो आंदोलन केले. यात २६ कार्यकर्ते व शेतकरी विरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले. आंदोलनकर्त्यांची रात्री उशिरा अटक व सुटका करण्यात आली. रेंगेपारच्या पुनर्वसनाच्या मागणी वरून राजकीय पुढाऱ्यांनी वैनगंगा नदी घाटात जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला होता. तेच आता खासदार व आमदार झाली आहेत. याशिवाय केंद्र व राज्यात सत्ता असताना घरकुलाचां प्रश्न सोडविण्यात येत नाही. तुुमसरच्या निवडणूक प्रचारसभेत मुख्यमंत्र्यांनी सिंदपुरी वासियांची घरकुल व तलाव दुरूस्तीचा प्रश्न मार्गी लावणार असल्याचे सांगितले होते. परिसरात विज पुरवठा करणारे तीन फिडर बंद आहेत. यामुळे नागरिकांना अल्प दाब विजेचा पुरवठा होत आहे. विजेच्या लपंडावाचे रोजचेच गाऱ्हाणे नागरिकांचे आहेत. जिल्ह्यात एकाच पक्षाचे तीन आमदार असताना बंद असणाऱ्या चांदपुर पर्यटन सुरू करण्यासाठी प्रयत्न केले नाही. सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पाला १५ लाखांचा निधी देण्यात आल्याचा गवगवा होत आहे. निधी खेचून आणल्याचे बॅनर्स लावण्यात आले आहे. परंतु प्रत्यक्षात हा निधी ३१ मार्च २०१७ पर्यंत पाणीपट्टी करांच्या वसुलीमधून विदर्भ पाटबंधारे विभागाला परंतु करायचे आहे. वीज जोडणी प्रकल्पांची झाली असता धरणाचे दरवाजे बंद करण्यात आले नाही. जलाशय भरत नाही तोपर्यंत वीजपुरवठा खंडित होऊ देणार नाही, याकरिता शिवसेनेच्या वतीने रास्ता रोको व जेलभरो आंदोलन करण्यात आले. यात जिल्हाप्रमुख राजेंद्र पटले यांच्यासह शेखर कोतपल्लीवार, होमराज राऊत, कमलाकर निखाडे, विनोद रहांगडाले, हेमराज शिंदे, भोजराज तुरकर, मनोज चौबे, अमित मेश्राम, दिलीप बिसने, कुंजीलाल पटले, राकेश शरणागते यांच्यासह २६ जणाविरूद्ध सिहोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (वार्ताहर)