शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
2
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
3
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
4
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
5
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
6
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
7
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
8
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
9
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
10
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
11
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
12
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
13
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
14
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
15
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
16
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
17
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
18
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
19
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
20
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...

खोटे कॅशबुक तयार करून केली स्वत:चीच फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2018 20:52 IST

काचेवानीचे माजी सरपंच तथा विद्यमान उपसरपंच प्रमिला रहांगडाले व तत्कालीन ग्रामसेवक प्रणय वासनिक यांनी घडवून आणलेल्या ४.७ लाखांच्या अपहार प्रकरणातून वाचण्यासाठी खोटे कॅशबुक तयार केले.

ठळक मुद्देसरपंच नसताना केल्या सह्या : माजी सरपंच व तत्कालीन ग्रामसेवकाचा अजब कारभार

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया-काचेवानी : काचेवानीचे माजी सरपंच तथा विद्यमान उपसरपंच प्रमिला रहांगडाले व तत्कालीन ग्रामसेवक प्रणय वासनिक यांनी घडवून आणलेल्या ४.७ लाखांच्या अपहार प्रकरणातून वाचण्यासाठी खोटे कॅशबुक तयार केले. पुढील काळात सरपंच दुसरे असताना सतत तीन वर्षांपर्यत सरपंच म्हणून सह्या मारल्या. तसेच ग्रामसेवकाने सरपंच नसणाऱ्या महिलेच्या सरपंच म्हणून स्वाक्षऱ्या मान्य करून दोघांनी स्वत:चीच फसवणूक करवून घेतली.चौकशीच्या दिवशी ९ एप्रिल रोजी अपहारातील आरोपी ग्रामसेवक वासनिक यांनी सामान्य फंडाची बोगस कॅशबूक तयार करून आणली. त्यात माजी सरपंच प्रमिला रहांगडाले व तत्कालीन ग्रामसेवक वासनिक यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. ही कॅशबूक १ जून २०११ ते ५ नोव्हेंबर २०१५ च्या कालावधीची तयार केली. ती बूक सध्याचे ग्रामसेवक के.टी. बाळणे यांना देवून, चार्जमध्ये दिली म्हणून स्वाक्षरी करण्यास लावण्याचा प्रयत्न केला. परंतु ते बाळणे यांनी नाकारून सरपंच एल.बी. मंडारी यांच्या सुपूर्द केले. त्या बोगस जमाखर्च रजिष्टरमध्ये (कॅशबूक) ग्रामसेवकाच्या १४९ व सरपंचाच्या १४७ स्वाक्षऱ्या दिसून येत आहेत. या बोगस कॅशबूकमुळे माजी सरपंच रहांगडाले व ग्रामसेवक वासनिक यांनी स्वत:च अपहार केल्याचे अप्रत्यक्षरित्या मान्य केल्याचे उघड होत आहे.अपहार करण्यात आलेली ४.७० लाखांची रक्कम आली कोठून व गेली कोठे? असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र बनावटी कॅशबूक तयार करून त्यांनी स्वत:च्या कर्मकांडाचा खुलासा स्वत:च करून सत्याची कबुली केली. एल.एड. कंपनीकडून ग्रामपंचायत (शासकीय) जमिनीचे भाडे १५ जुलै २०११ रोजी २५ हजार ४७७ रूपये खात्यावर जमा करण्यात आले. याच दिवशी २५ हजार रूपयांचा विड्रॉल करून मुंडीकोटा येथून लाईट खरेदी दाखविण्यात आली. १८ मार्च २०१४ रोजी या खात्यावर केवळ तीन रूपये जमा होते.गॅमन कंपनीकडून गोडावून तयार केल्याबद्दल १९ मार्च २०१४ रोजी ९३ हजार ७५० रूपये ग्रामपंचायतला देण्यात आले होते. २१ मार्च २०१४ रोजी दोन लाख ६० हजार रूपये रंगरंगोटीकामी दाखविण्यात आले. एल.टी. कंपनीने मनोरा (टॉवर) कर म्हणून ५२ हजार ८०० रूपये ग्रामपंचायतला दिले. १५ एप्रिल २०१४ रोजी प्रदीप बडगे व मजुरांना १९ हजार रूपये, काचेवानीचे चौधरी यांना मुरूम घालण्यासाठी एक लाख ७ हजार रूपये दिल्याचे बोगस कॅशबूकमध्ये दाखविण्यात आले. १६ एप्रिल २०१४ रोजी चौधरी यांना मुरूम ट्रीपबद्दल नऊ हजार ८०० रूपये व याच दिवशी प्रदीप बडगे यांना मुरूम पसरविण्याकरिता १९ हजार रूपये दिल्याचेही बोगस कॅशबूकमध्ये सांगितले आहे. १७ एप्रिल २०१४ रोजी प्रदीप बडगे व इतरांना मजुरी म्हणून ११ हजार १३८ रूपये दिल्याचे सांगितले आहे. तसेच ३१ मे २०१४ रोजी प्रदीप बडगे व इतर यांना मजुरीचे १९ हजार रूपये दिल्याचे दाखविण्यात आले आहे.पण वास्तविकपणे हा खाता ग्रामपंचायतला दाखविण्यात आला नाही. यात दाखविण्यात आलेले खरेदी बिले व दाखविलेली कामे खोटी असून याची चौकशी केल्यास सर्व भोंगळ कारभार उघड होईल, असे ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.अपहार, फसवणूक, खोटी कॅशबूक, चुकीची कामे व मजूर दाखविणे अशा अनेक प्रकरणात माजी सरपंच प्रमिला रहांगडाले व ग्रामसेवक प्रणय वासनिक जबाबदार आहेत. तसेच माजी सरपंचाचे पतीसुद्धा सहयोगासाठी अडकण्याची शक्यता आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार असल्याची माहिती संदीप अंबुले, सरपंच भंडारी, सदस्य रामला अंबुले, दिव्या भलावी व संतोष चौधरी यांनी ‘लोकमत’ला दिली आहे.खोट्या कॅशबुकमुळे दोघेही अडकलेस्वत:चा बचाव करण्याच्या नादात खोटे कॅशबुक तयार करून आपण गुन्हेगार असल्याचा ठळक लेखी पुरावा ग्रामसेवक प्रणय वासनिक व माजी सरपंच तथा विद्यमान उपसरपंच प्रमिला रहांगडाले यांनी दिला. त्यात या दोघांच्या ५ नोव्हेंबर २०१५ पर्यंत जमाखर्चावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. मात्र स्वाक्षरी करणाऱ्या माजी सरपंच केवळ २०१२ पर्यंतच सरपंच होत्या. पण त्यांनी २०१५ पर्यंत सरपंच म्हणून स्वाक्षऱ्या केल्या आहेत. ग्रामसेवक मात्र तेच होते. ग्रामसेवक वासनिक यांनी नवीन सरपंच गायत्री चौधरी असताना माजी सरपंचाच्या सह्या कशा घेतल्या व मंजूर केल्या, असा सवाल आहे.बँक खाते अनेक, पण कॅशबुक एकचसामान्य फंडाचे खाते अनेक असू शकतात, मात्र कॅशबूक एकच असते. ग्रामपंचायतमध्ये सामान्य फंडाचे खाते आहे व त्याची कॅशबुकही आहे. मात्र ग्रामपंचायतमध्ये कोणताही हिशेब नसताना आठव्या वर्षी अचानक बोगस कॅशबुक तयार झाली. यात १ जून २०११ पासून ५ नोव्हेंबर २०१५ पर्यंत खाते (क्रमांक ५९४३०२०१०००५०५१) याच खात्याचा जमाखर्च आहे. सामान्य फंडाचे दोन खाते असू शकतात, पण कॅशबुक वेगळे कसे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.चौकशी अधिकाऱ्यांच्या सुपूर्द केले खोटी कॅशबुकचौकशीच्या दिवशी ९ एप्रिल २०१८ रोजी सायंकाळी खोटी कॅशबूक तयार करून माजी सरपंच तथा वर्तमान उपसरपंच यांचे पती राधेश्याम रहांगडाले यांनी आणून ग्रामसेवक के.टी. बाळणे यांना देवून स्वाक्षरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र बाळणे यांनी स्पष्ट नकार देत ती बनावट कॅशबूक सरपंचांच्या सुपूर्द केली. खोटी कॅशबूक बनविल्याची माहिती चौकशी अधिकारी तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश बागडे यांना १० एप्रिल २०१८ रोजी देण्यात आली.कामही नाही व मजूरही नाहीमाजी सदस्य तथा तक्रारदार संदीप अंबुले यांनी सांगितले की, प्रदीप बडगे व दाखविण्यात आलेले इतर मजूर स्थानिक नाहीत. त्यांना काम करताना मी किंवा काचेवानीच्या कोणत्याही इसमाने बघितले नाही. दोन लाख ६० हजार रूपयांचे रंगरंगोटीचे काम

सुद्धा झाले नाही. मुरूमही घालण्यात आले नाही. बोगस कॅशबूकमध्ये खोटे काम दाखवून स्वत:ची फसवणूक करून घेतल्याचे ग्रामपंचायत पदाधिकाºयांचे म्हणणे आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायत