शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

जप्तीची कारवाई थांबली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 00:11 IST

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प देवरी अंतर्गत सन २००५ मध्ये कार्यालयीन कामाकरिता देवरी येथील व्यापारी सुनील अग्रवाल यांची मॅटेडोर भाड्याने घेतली होती. या मॅटेडोरचे भाडे ३० हजार २५३ रुपये झाले होते.

ठळक मुद्देदेवरी प्रकल्प कार्यालयातील प्रकार :भाड्याचे बिल न मिळाल्यामुळे न्यायालयाचे आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कदेवरी : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प देवरी अंतर्गत सन २००५ मध्ये कार्यालयीन कामाकरिता देवरी येथील व्यापारी सुनील अग्रवाल यांची मॅटेडोर भाड्याने घेतली होती. या मॅटेडोरचे भाडे ३० हजार २५३ रुपये झाले होते. ते भाडे मागण्यासाठी या कार्यालयाच्या चकरा मारुन थकल्याने त्यांनी देवरी न्यायालयात प्रकरण दाखल केले.न्यायालयाच्या आदेशावरून ही जप्तीची कारवाई बुधवारी करण्यात येत होती. परंतु अधिकाºयांच्या मध्यस्तीने ही कारवाई थांबली. भाड्यासाठी आठ वर्षापासून प्रतिक्षेत असलेले सुनील अग्रवाल यांनी देवरी न्यायालयात प्रकरण दाखल केले. या दिवाणी दावा प्रकरणात सदर रकमेच्या वसुलीकरिता देवरी येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पातील फर्निचर जप्तीची कारवाईचे आदेश आज (दि.१७) रोजी दिल्याने सदर जप्तीच्या कारवाईत सुरू केली. यावेळी उपस्थित अधिकाºयांनी भाड्याचे रोख रक्कम दिल्याने जप्तीची कारवाई टळली.सविस्तर असे की, सन २००५ मध्ये देवरी येथील एकात्मीक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत कार्यालयीन कामाकरिता देवरी येथील व्यापारी सुनील अग्रवाल यांची मॅटेडोर भाड्याने घेतली होती.या मॅटेडोरचे भाडे ३० हजार २५३ रुपये झाले होते. हे भाडे मागण्यासाठी मागील आठ वर्षापासून त्या कार्यालयाच्या चकरा काढल्या जात होत्या. परंतु पैसे न मिळाल्याने हतबल होऊन अखेर सुनील अग्रवाल यांनी या भाड्याचे मागणी प्रकरण देवरी न्यायालयात दाखल केले. या दिवाणी दावा प्रकरणात सदर रकमेच्या वसुलीकरिता दरख्वास क्रमांक ६/१७ अंतर्गत देवरी येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पातील फर्निचर जप्तीची कारवाई आज (दि.१७) आदेश दिले. यावरुन सुनील अग्रवाल न्यायालयीन कर्मचाºयांच्या ताफ्यासह कार्यालयात धडकले आणि जप्तीची कारवाई सुरू केली. दरम्यान या प्रकल्प कार्यालयातील सहायक प्रकल्प अधिकारी भोंगाळे, सहायक लेखा अधिकारी आर.एम. जिभकाटे व आदिवासी विकास निरीक्षक मेहकरे यांनी कारवाईत मध्यस्ती करीत सदर रक्कम ३० हजार २५३ रुपये रोख जमा करुन ही जप्तीची कारवाई थांबविली.