शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बांधकाम विभागावरील जप्तीची कारवाई टळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 23:30 IST

रस्ता बांधकामासाठी अधिग्रहीत केलेल्या जमिनीच्या वाढीव मोबदल्यासाठी येथील सार्वजनिक बांधकाम विभागावर जप्तीच्या कारवाईची वेळ आली होती.

ठळक मुद्देजमिनीच्या वाढीव मोबदल्याचे प्रकरण : कार्यकारी अभियंत्यांनी दिले आश्वासन

आॅनलाईन लोकमतगोंदिया : रस्ता बांधकामासाठी अधिग्रहीत केलेल्या जमिनीच्या वाढीव मोबदल्यासाठी येथील सार्वजनिक बांधकाम विभागावर जप्तीच्या कारवाईची वेळ आली होती. मात्र कार्यकारी अभियंता सोनाली चव्हाण यांनी वेळीच पाच लाख रूपये रोख व उर्वरीत रक्कम पुढील तारखेला देण्याचे आश्वासन दिले. यावर जमीन मालकांनी जप्तीची कारवाई थांबविली.सविस्तर असे की, येथील अ‍ॅड. उदय गोपलानी यांच्या मालकीची गट क्रमांक ५११, व ५१२-२-ए २ मधील ४२.५० हेक्टर जमीन पूर्वी बायपाससाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने अधिग्रहीत केली आहे. जमिनीसाठी गोपलानी यांना पूर्वीच मोबदला देण्यात आला आहे. मात्र जमिनीचा मोबदला कमी मिळाल्याने मोबदला वाढवून देण्यात यावा अशी मागणी गोपलानी यांनी न्यायालयात केली होती.यावर न्यायालयाने त्यांना वाढीव मोबदला देण्यात यावा असा निर्णय १४ डिसेंबर २०१५ रोजी सुनावला. यात वाढीव मोबदल्यापोटी २५ लाख ५० हजार रूपये व त्यावर १६ जानेवारी १६ पर्यंतचे व्याज मिळून ४४ लाख ३७ हजार ५६ रूपये होत आहे. मात्र बांधकाम विभागाकडून गोपलानी यांना वाढीव मोबदल्याची रक्कम देण्यात आली नाही.अशात न्यायालयाने ८ जून २०१६ रोजी जप्तीचे आदेश दिले. मात्र त्यानंतरही बांधकाम विभागाकडून आश्वासन देत वेळ काढली गेली. मात्र सहनशीलतेचा बांध तुटल्याने गोपलानी यांनी जप्तीचे आदेश आणले व आपले वकील सुमीत राजनकर यांच्यासोबत सार्वजनिक बांधकाम विभागात जप्तीची कारवाई करण्यासाठी सोमवारी (दि.८) धडकले. जप्तीची कारवाई केली जाणार असल्याने वेळीच बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता चव्हाण यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलणी केली.वरिष्ठांच्या आदेशानंतर अखेर चव्हाण यांनी अ‍ॅड. राजनकर यांच्याशी बोलणी करून पाच लाख रूपये रोख व पुढील तारखेत उर्वरीत रक्कम देण्याचे आश्वासन दिले. कार्यकारी अभियंता चव्हाण यांच्या विनंतीला मान देत अखेर अ‍ॅड. राजनकर यांनी जप्तीची कारवाई थांबविली.२१ जणांना द्यायचे आहेत पैसेपूर्वी बायपाससाठी जमीन अधिग्रहीत करण्यात आलेल्यांपैकी २१ जणांना सार्वजनिक बांधकाम विभागाला वाढीव मोबदला द्यावयाचा आहे. वाढीव मोबदल्यासाठी बांधकाम विभागाने शासनाकडे सुमारे १२ कोटींची मागणी केली आहे. यात १८ जणांनी जप्ती आदेश आणले असून त्यांना ३.९८ कोटी रूपये बांधकाम विभागाला तातडीने द्यावयाचे आहेत. विशेष म्हणजे, जप्तीचे आदेश आणणाऱ्या या १८ जणांत ७ गोपलानी परिवारातील जमीन मालक आहेत. मात्र शासनाकडून निधी न आल्यामुळे ही नौबत आल्याचे कार्यकारी अभियंता चव्हाण यांनी सांगीतले.