शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

जंगलात लपविलेला रेतीचा साठा जप्त

By admin | Updated: November 5, 2016 01:17 IST

दिवाळीच्या सणाला महसूल अधिकारी सुट्टीवर गेल्याचे पाहून आमगावातील रेती माफीयांनी दिवाळीच्या दिवशी रात्रभर नदीतील रेती चोरून

दिवाळीच्या रात्री रेती चोरी : आठ ठिकाणातील साठ्यांवर धाडआमगाव : दिवाळीच्या सणाला महसूल अधिकारी सुट्टीवर गेल्याचे पाहून आमगावातील रेती माफीयांनी दिवाळीच्या दिवशी रात्रभर नदीतील रेती चोरून शहरालगतच्या जंगल परिसरात लपवून ठेवला. घरबांधणी करणाऱ्यांच्या मागणीनुसार त्या साठ्यातील रेती त्यांना पुरविली जात होती. गुरूवारच्या रात्री तहसीलदार साहेबराव राठोड यांनी कर्मचाऱ्यांना घेऊन ही कारवाई केली. आमगाव तालुक्यात ४०० ट्रॅक्टर आहेत. त्यापैकी १०० ट्रॅक्टर हे रेती वाहतूकीचे काम करतात. मागील अनेक दिवसापासून महसूल अधिकाऱ्यांनी मोकाट सुटलेल्या रेती माफीयांना आवळल्याने मागील अनेक दिवसापासून रेती मिळणे बंद झाले होते. विटा सिमेंटचे कामही बंद पडले होते. यामुळे महसूल प्रशासनाविरूध्द काही ट्रॅक्टर चालकांचा आक्रोशही होता. तरीही अधिकाऱ्यांची नजर चुकवून काही ट्रॅक्टर चालक रेतीची चोरी करून विकत होते. दिवाळीच्या सणाला अधिकारी स्वगावी दिवाळी साजरी करायला जाणार यासाठी रेतीमाफीयांनी लक्ष्मी पूजनाच्या रात्रीच नदीतील रेती काढून मागणी केलेल्या लोकांच्या घरी टाकली. तसेच गावालगतच्या जंगल परिसरात रेतीचे ढिगारे करून ठेवले होते. याची भनक लागल्यावर तहसीलदार राठोड यांनी गुरूवारी दोन डोजर, एक जेसीबी व चार ट्रॅक्टर लाऊन आमगाव, मोहनटोला जंगल परिसरात साठवून ठेवलेल्या आठ ठिकाणी धाड घालून ८० ब्रास रेती जप्त करून तहसील कार्यालयात आणले. ती रेती कुणी आणून ठेवली यासंदर्भात कुणाकडून माहिती मिळत नाही. मोहनटोला, सेमोदेमो पहाडी, सालेकसा रोड, वाघनदी काठावर, राईस मील समोर अश्या आठ ठिकाणातून रेतीचा साठा जप्त करण्यात आला. (तालुका प्रतिनिधी)५६ ब्रास रेतीचा लिलावमुंडीपार येथील ५६ ब्रास रेतीचा साठा करून ठेवला होता. याची माहिती तहसीलदार साहेबराव राठोड यांना २० आॅक्टोबर रोजी लागताच त्यांनी तो साठा जप्त करून ८५ हजारात २७ आॅक्टोबरला ती रेती विक्री केली आहे. रेती चोरणाऱ्या ट्रॅक्टरला पकडल्यास त्या वाहनावर १५ हजार ४०० रूपयाचा दंड आकारण्यात येत आहे.