शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सचिवांनी केली रोहयोच्या कामांची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 23:09 IST

रोजगार हमी योजना व जलसंधारण सचिव एकनाथ ढवले यांनी मुंडीकोटा येथे तलाव खोलीकरण व अर्जुनी येथे ग्रामपंचायत अंतर्गत खैरबंदा जलाशयाच्या कालव्यातील गाळ काढणे, माती भरनाच्या कामांची रविवारी (दि.१७) पाहणी केली व कामावर असलेल्या मजुरांशी संवाद साधला.

ठळक मुद्देअर्जुनी व मुंडिकोटा येथे दिली भेट : मजुरांशी साधला संवाद

आॅनलाईन लोकमतपरसवाडा : रोजगार हमी योजना व जलसंधारण सचिव एकनाथ ढवले यांनी मुंडीकोटा येथे तलाव खोलीकरण व अर्जुनी येथे ग्रामपंचायत अंतर्गत खैरबंदा जलाशयाच्या कालव्यातील गाळ काढणे, माती भरनाच्या कामांची रविवारी (दि.१७) पाहणी केली व कामावर असलेल्या मजुरांशी संवाद साधला. मजुरांना देण्यात येणाऱ्या सुविधा व मजुरी याबाबत विचारणा करून मजुरांसोबतही संवाद साधला.तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून शेतीची कामे नसल्यामुळे शेतकरी व शेतमजूरांच्या हाताला काम नाही. अशात ग्रामीण भागातील लोकांच्या हाताला काम मिळावे यासाठी रोजगार हमी योजनेची कामे सुरू करण्याची मागणी होती व त्यानुसार ग्रामीण भागात रोहयोच्या कामांना सुरूवात होत आहे. रोहयोच्या कामांची पाहणी करण्यासाठी रोजगार हमी योजना व जलसंधारण सचिव ढवले रविवारी (दि.१७) ग्राम मुंडीकोटा व अर्जुनी येथे भेट दिली. खंडविकास अधिकारी जावेद इनामदार यांनी पंचायत समिती स्तरावर ९० टक्के गावांत ग्रामपंचायत अंतर्गत कामे सुरु असून १०० दिवस मजूर काम करतील त्याप्रमाणे नियोजन असल्याचेही निदर्शनात आणून दिले.याप्रसंगी ढवले यांनी, सिंचनाची कामे कमी प्रमाणात होत असून शेतकऱ्यांनी ती कामे करावी. तसेच विहिर, तलाव खोलीकरण, नाला सरळीकरण व खोलीकरणाची कामे मोठ्या प्रमाणात करावी असे सांगीतले. याप्रसंगी जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी, मजुरांना कामे करताना शेतातील वृक्ष कटाई करु नये. मोठ्या वृक्षांचे संवर्धन करण्याची गरज आहे. नाला सरळीकरण व तलावाची कामे मोठ्या प्रमाणात केली गेली पाहिजे, यासाठी ग्रामपंचायतने पुढाकार घेणे व मजुरांनीही काम करणे गरजेचे असल्याचे मजुरांना समजावून सांगितले. या भेटीत सचिव ढवले यांच्यासोबत मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, तहसीलदार संजय रामटेके, उपविभागीय अधिकारी गंगाराम इळपाचे, उपविभागीय कृषी अधिकारी वनवार, जिल्हा कृषी अधीक्षक इंगळे, निवासी उपजिल्हाधिकारी प्रविण महिरे, विस्तार अधिकारी सुरेश निमजे, भायदे, पशुधन अधिकारी डॉ. प्रतांश गंगापारी, बालविकास प्रकल्प अधिकारी दुबे, चरडे, निखाडे, कनिष्ठ अभियंता रामदास बावनकर, कृषी सहायक सचिन लाडे, कमल सलामे, अजय खंडाईत, ग्रामसेवक भिलकर, सरपंच, सर्व सदस्य व जनप्रतिनिधी उपस्थित होते.