शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

प्राण्यांच्या मृत्यूचे रहस्य कायम

By admin | Updated: July 10, 2015 01:45 IST

शहराच्या पश्चिम भागाकडील पैकनटोली व गौैतमनगरातील प्राण्यांच्या मृत्यूचे रहस्य अद्याप गुलदस्त्यात आहे.

प्रकरण पैकनटोली व गौतमनगरचे : कॅमेऱ्यांत कसलेही छायाचित्र नाहीगोंदिया : शहराच्या पश्चिम भागाकडील पैकनटोली व गौैतमनगरातील प्राण्यांच्या मृत्यूचे रहस्य अद्याप गुलदस्त्यात आहे. याचा छडा लावण्यासाठी वनविभागाने घटनास्थळी कॅमेरे लावले. परंतु कॅमेऱ्यांत अद्यापही कसलेही छायाचित्रे आली नाही. पैकनटोली निवासी प्रकाश रहांगडाले यांच्या तीन शेळ्या व दोन कोंबड्या रविवारी मृतावस्थेत आढळल्या होत्या. मृत शेळ्या व कोंबड्यांच्या मानेजवळ चावा घेतल्याचे चिन्ह होते. तिथून रक्त वाहत होते. याचप्रकारे कुंवरलाल नेवारे यांच्या घरीसुद्धा रविवारी पहाटे एक शेळी व पाच कोंबड्या मृतावस्थेत आढळल्या होत्या. तर या घटनांच्या काही दिवसांपूर्वी गौतमनगर निवासी प्यारूभाई यांच्या घरातील कोंबड्या व सात शेळ््या मारण्यात आल्या होत्या. या प्रकरणात मात्र सहायक उपवन संरक्षक अश्वीन ठक्कर या पाळीव प्राण्यांच्या मृत्यूसाठी वन्यप्राणी जबाबदार नसल्याचे सांगतात. त्यामुळे खरा आरोपी कोण? असा प्रश्न परिसरातील नागरिकांना पडला असून ते दहशतीत आहेत. तसेच वनविभागाकडून घटनास्थळी कॅमेरे लावण्यात आले आहेत. त्यामुळे शेळ्या व कोंबड्यांना कोण मारतो याचे गुढ उघडे होईल, अशी भूमिका वनविभागाची होती. मात्र आठवडा लोटूनही या कॅमेऱ्यांमध्ये काहीही टिपले गेले नाही. त्यामुळे प्रकरण आणखी संशयास्पद होत आहे. (प्रतिनिधी)घटना बंद, विविध चर्चांना उधाणया प्रकरणात कुणी दहशत पसरवित असून तिघांना अटक करण्यात आल्याच्या चर्चा बुधवारी शहरात होत्या. परंतु घटना बंद झाल्या असून कुणालाही अटक करण्यात आले नसल्याचे ाा प्रकरणात कुणाला ताब्यात घेतले का असे पोलिसांना विचारणा केल्यावर त्यांनी घटना बंद झाल्या परंतु कोणत्याही व्यक्तीला अटक करण्यात आले नाही असे तपासी हवालदार रविकांत दराडे यांनी सांगितले. यासंदर्भात फिर्यादी भूपेंद्र रहांगडाले व त्यांच्या नातेवाईकांचे बयान घेण्यात आले. त्यात त्यांनी कुत्र्यासारखा दिसणारा लालसर रंगाचा जनावर होता असे सांगितले. परंतु कुणीती व्यक्ती ती जमीन हडपण्यासाठी दहशत पसरवित असावा अशा चर्चांना बुधवारी दिवसभर उधान आले होते.