शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

आरटीईच्या दुसऱ्या सोडतीत ३३२ बालकांना संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 23:06 IST

बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ मधील कलम १२(१)(सी) नुसार वंचित व दुर्बल घटकातील बालकांना विना अनुदानित व कायम विना अनुदानित शाळांमध्ये किमान २५ टक्के प्रवेश ठेवण्याची तरतूद केली. शासन निर्णयानुसार २५ टक्के मोफत प्रवेश योजना आॅनलाईन पद्धतीने राबविण्यात येत आहे.

ठळक मुद्दे२७ जूनपर्यंत घेता येणार प्रवेश : अनेक विद्यार्थी प्रवेशापासून वंचित

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ मधील कलम १२(१)(सी) नुसार वंचित व दुर्बल घटकातील बालकांना विना अनुदानित व कायम विना अनुदानित शाळांमध्ये किमान २५ टक्के प्रवेश ठेवण्याची तरतूद केली. शासन निर्णयानुसार २५ टक्के मोफत प्रवेश योजना आॅनलाईन पद्धतीने राबविण्यात येत आहे. यासाठी दुसरी सोडत शनिवारी १५ रोजी काढण्यात आली. यात गोंदिया जिल्ह्यातील ३३२ बालकांना संधी मिळाली आहे.पहिल्या लॉटरीत या बालकांना प्रवेश मिळाला. निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांच्या मोबाईलवर एक एसएमएस पाठविण्यात आला. जन्माचे प्रमाणपत्र व वास्तव्याचा पुरावा, सामाजिक वंचित घटकातील पालकांचा जातीचा दाखला, आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांच्या पालकांचे १ लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असलेला उत्पन्नाचा दाखला. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ४० टक्यापेक्षा जास्त अपंगत्वाचे प्रमाणपत्र सादर करावे लागले. गोंदिया जिल्ह्याच्या १४१ शाळांमध्ये १०४३ जागांसाठी प्रवेश द्यायचा होता. या जागांसाठी २ हजार ७३१ अर्ज करण्यात आले होते. यातील ६०५ विद्यार्थ्यांनी शाळेत जाऊन प्रवेश घेतला. जिल्ह्यातील ७८.९८ टक्के विद्यार्थ्यांनी प्रवेश मिळविल्यामुळे जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकात आला. त्यानंतर दुसºया सोडतीत आता ३३२ बालकांना मोफत प्रवेशाची संधी मिळाली आहे. या दुसºया सोडतीत निवड झालेल्या बालकांना २७ जूनच्या आत शाळेत प्रवेश घेणे आवश्यक आहे.बºयाच पालकांनी अर्जामध्ये अपुरी माहिती भरल्याने त्यांचे अर्ज रद्द करण्यात आले. त्यामुळे त्यांच्या पालकांना आरटीईतंर्गत प्रवेशापासून वंचित राहावे लागले.