शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

उमेदवारी अर्जाचा दुसरा दिवसही निरंक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2021 05:00 IST

जिल्हा परिषदेच्या ५३, पंचायत समितीच्या १०६ आणि नगरपंचायतच्या ५१ जागांसाठी येत्या २१ डिसेंबरला निवडणूक होणार आहे. जि.प. व पं.स.क़रिता उमेदवारी अर्ज दाखल करण्याची ६ डिसेंबर तर नगरपंचायतसाठी ७ डिसेंबर ही शेवटची तारीख आहे. बुधवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली असली तरी गुरुवारी दुसऱ्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्यांची संख्या निरंक होती.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया :  जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगर पंचायत निवडणुकीसाठी बुधवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली. पहिल्या दिवशी एकाही उमेदवाराने अर्ज दाखल केला नव्हता तर गुरुवारी (दि. २) दुसऱ्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्यांची संख्या निरंक होती. त्यामुळे शेवटच्या दोन दिवसांत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी होण्याची शक्यता आहे.जिल्हा परिषदेच्या ५३, पंचायत समितीच्या १०६ आणि नगरपंचायतच्या ५१ जागांसाठी येत्या २१ डिसेंबरला निवडणूक होणार आहे. जि.प. व पं.स.क़रिता उमेदवारी अर्ज दाखल करण्याची ६ डिसेंबर तर नगरपंचायतसाठी ७ डिसेंबर ही शेवटची तारीख आहे. बुधवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली असली तरी गुरुवारी दुसऱ्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्यांची संख्या निरंक होती. त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अद्यापही उमेदवार वेट ॲण्ड वॉचच्या भूमिकेत असल्याचे चित्र आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना या प्रमुख राजकीय पक्षांचे उमेदवार निश्चित झालेले नाही. सध्या मुलाखतीचे सत्र सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस गुरुवारी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या तर काँग्रेस मंगळवारी मात्र भाजपने अद्यापही मुलाखतीची तारीख निश्चित केलेली नाही. तर सुरुवातीलाच उमेदवारी जाहीर केली तर बंडखोरीची शक्यता अधिक असते. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी जपून पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. सर्व जण आधी कोण उमेदवारांची यादी जाहीर करतो, त्यानंतर त्या तुलनेत आपल्या पक्षाचा तगडा उमेदवार उतरवायचा या तयारीत आहेत. त्यामुळेच उमेदवारांच्या याद्या जाहीर करण्यास विलंब केला जात आहे. 

निवडणूक पुन्हा लांबणीवरची चर्चा ओबीसी आरक्षण प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दाखल आहे. या याचिकेवर काय निर्णय येतो त्यावर पुढील भविष्य ठरणार आहे. राज्य निवडणूक आयोगानेसुद्धा त्यासंबंधीची सूचना आधीच केली आहे. मात्र काही जण या विषयाला वेगळा रंग देत निवडणूक लांबणीवर गेल्याची अफवा पसरवीत आहेत.

वरिष्ठ नेते फिरविणार याद्यांवर हात - सर्वच राजकीय पक्षांच्या जिल्हाध्यक्षांनी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या याद्या तयार केल्या आहेत. यापैकी काही उमेदवारांच्या मुलाखती झाल्या असून काहींना तुमचे नाव फायनल असून तुम्ही तयारीला लागा, असा मेसेज देण्यात आला आहे. पण या याद्यांवर पक्षाचे वरिष्ठ नेते अंतिम हात फिरविणार असून त्यानंतरच या याद्या फायनल केल्या जाणाऱ्या आहेत. 

उमेदवारीपूर्वीच लक्ष असू द्या

- अद्यापही जिल्हा परिषद व पंचायत, नगरपंचायतसाठी एकाही उमेदवारी अर्ज दाखल केलेला नाही. मात्र उमेदवारी आपल्यालाच मिळणार अशी आशा बाळगून त्यांनी आपल्या मतदारसंघातील उमेदवारांच्या गाठीभेटी घेणे सुरु केले आहे. त्यामुळे अनेक संभाव्य उमेदवार सध्या भाऊ लक्ष असू द्या म्हणत रामराम घेत असल्याचे चित्र जिल्ह्यातील अनेक जिल्हा परिषद क्षेत्रात सध्या पाहयला मिळत आहे. 

 

टॅग्स :Electionनिवडणूक