शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

वर्षातील दुसरी आमसभा आज

By admin | Updated: August 10, 2016 00:02 IST

नगर परिषदेची या वर्षातील दुसरी आमसभा बुधवारी (दि.१०) आयोजीत करण्यात आली आहे. जानेवारी महिन्या नंतर ही आमसभा होत असून

३५ विषयांवर होणार चर्चा : तिजोरीत भर व भार घालणारे विषय गोंदिया : नगर परिषदेची या वर्षातील दुसरी आमसभा बुधवारी (दि.१०) आयोजीत करण्यात आली आहे. जानेवारी महिन्या नंतर ही आमसभा होत असून या सभेसाठी ३५ विषयांची सूची तयार करण्यात आली आहे. शहर विकासासाठी महत्वपूर्ण अशा विषयांवर या आमसभेत चर्चा होणार असतानाच दोन शाळांच्या समायोजनाचा गंभीर सुद्धा मांडण्यात येणार आहे. दर दोन महिन्यांतून एकदा आमसभा घेणे नगर परिषद अधिनियमानुसार बंधनकारक आहे. मात्र येथे तब्बल सहा महिन्यानंतर ही आमसभा घेतली जात आहे. त्यामुळे कित्येक विषय रेंगाळत चालले होते. परिणामी यंदाच्या आमसभेत ३५ विषयांचा समावेश करण्यात आला आहे. या ३५ विषयांत नगर परिषदेच्या तिजोरीत भर घालणारे काही विषय आहेत. तर तिजोरीवर भार देणारेही विषय दिसून येत आहेत. शहराचे सौंदर्यीकरण वाढविणारे विषय सुद्धा असून नगर परिषदेच्या कर्तव्यतत्परतेवर प्रश्नचिन्ह लावणारे विषयसुद्धा मांडले जाणार आहेत. (शहर प्रतिनिधी) ‘त्या’ तीन कर्मचाऱ्यांना कामावर घेणार नगर परिषदेची स्थायी समितीची सभा मंगळवारी (दि.९) पार पडली. २३ विषयांना घेऊन घेण्यात आलेल्या या सभेत कर विभागातील निलंबीत कर्मचारी जगदीश गाते, सुशिल बिसने व पप्पु नकाशे यांना कामावर परत घेण्याबाबत मंजुरी देण्यात आली. शहीद स्मारकाचे विद्युतीकरण, उड्डाणपुलांवरील पथदिव्यांची दुरूस्ती, शहरातील पथदिव्यांचे स्वीचबॉक्स बदलणे यासह अन्य विषयांना मंजूरी देण्यात आली. हे विषय आहेत महत्वाचे नवनिर्मित नाट्य मंदिराला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देऊन छत्रपतींची प्रतिमा स्थापीत करणे. शहरातील सरकारी तलाव तसेच सिव्हील लाईन्स परिसरातील नाग तलावाचे सौंदर्यीकरण करणे. लोधी समाजाच्या मागणीवरून केटीएस रूग्णालयात कुवर तिलकसिंह नागपूरे यांची प्रतिमा उभारणे. नगर परिषदेत कार्यरत रोजंदारी कर्मचाऱ्यांना नियमीत वेतन श्रेणीत कायम करण्यासाठी शासनस्तरावर शिफारस करणे. घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत कचराकुंड्या खरेदीसाठी निविदा मंजूरी . तसेच १२० लोखंडी कंटेनर खरेदी करणे. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ जयंती निमित्त आहार वाटप करणे.