शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

हंगामातील सर्वाधिक ४५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 22:37 IST

मागील तीन चार दिवसांपासून जिल्ह्यातील तापमानात सातत्याने वाढ होत आहे. त्यातच शनिवारीपासून (दि.२५) नवतपाला सुरूवात झाल्याने तापमानात अधिक वाढ झाली आहे. शनिवारी जिल्ह्यात या हंगामातील सर्वाधिक ४५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर पुढील आठ दिवस तापमानात पुन्हा वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

ठळक मुद्देनवतपाला सुरुवात। वाढत्या तापमानाने शहरवासीय हैराण, पुन्हा आठ दिवस उन्हाच्या झळा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मागील तीन चार दिवसांपासून जिल्ह्यातील तापमानात सातत्याने वाढ होत आहे. त्यातच शनिवारीपासून (दि.२५) नवतपाला सुरूवात झाल्याने तापमानात अधिक वाढ झाली आहे. शनिवारी जिल्ह्यात या हंगामातील सर्वाधिक ४५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर पुढील आठ दिवस तापमानात पुन्हा वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. वाढत्या तापमानामुळे जिल्ह्यावासीय चांगलेच त्रस्त झाले असून याचा दैनदिन कामांवर सुध्दा परिणाम होत आहे.जिल्ह्यातील सर्वाधिक ४४.४ तापमानाची नोंद यंदा २१ मे रोजी झाली. त्यानंतर तापमानाचा हा रेकार्ड मोडत शनिवारी (दि.२५) ४५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मे महिन्यातील हे सर्वाधिक तापमान होय. मागील सात आठ वर्षातील तापमानाच्या आकडेवारी नजर टाकल्यास यंदा मे महिन्यात सर्वाधिक ४५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तापमानात सातत्याने वाढ होत असल्याने जिल्हावासीय चांगलेच हैराण आहे.तर कधी ढगाळ वातावरण सुध्दा निर्माण होत असल्याने उकाडा वाढत आहे. त्यामुळे कुलर,पंखे सुध्दा काम करीत नसल्याने अंगाची लाहीलाही होत आहे.वाढत्या तापमानामुळे दुपारच्या वेळेस शहरातील रस्ते सामसुम होत आहे. आवश्यक काम असेल तरच नागरिक घराबाहेर पडत असल्याचे चित्र आहे. शनिवारपासून नवतपाला सुरूवात झाली. या कालावधी सरासरी तापमानात ३ ते ४ अंश सेल्सिअस वाढ होत असते. त्यामुळे हे नऊ दिवस म्हणजे अतिशय उष्ण असतात. नवतपा सुरू झाल्यानंतर शेतकरी सुध्दा शेतीच्या मशागतीच्या कामे पहाटेपासून सुरू करुन सकाळी दहा वाजेपर्यंत आटोपत असतात. मात्र यंदा सरासरी तापमान हे ४३ अंश सेल्सिअसच्यावर असल्याने नवतपात जिल्ह्याचे तापमान ४५ अंशावर जाण्याचा अंदाज वर्तविला जात होता. तो अंदाज सुध्दा खरा ठरत आहे. नवतपामुळे जिल्ह्यावासीयांना ४ जूनपर्यंत उन्हाच्या झळा सहन कराव्या लागणाऱ्या आहे.त्यामुळे कधी एकदाचा उन्हाळा संपतो आणि पावसाळ्याला सुरूवात होवून उकाड्यापासून दिलासा मिळतो, याकडेच नागरिकांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :Temperatureतापमान