शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

हंगाम लोटला पण शेतकºयांना ताडपत्र्या मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 23:31 IST

कृषी विभागांतर्गत जिल्ह्यातील १६६६ शेतकºयांना ५० टक्के अनुदानावर ताडपत्री वाटप करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या १० आॅगस्ट २०१७ रोजीच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला.

ठळक मुद्दे२५ लाखांचा निधी पडून : सदस्याने वेधले सभागृहाचे लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कृषी विभागांतर्गत जिल्ह्यातील १६६६ शेतकºयांना ५० टक्के अनुदानावर ताडपत्री वाटप करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या १० आॅगस्ट २०१७ रोजीच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. यासाठी ५० लाख रुपयांचा निधी खर्च करण्यास मंजुरी देण्यात आली. मात्र खरीप हंगाम संपत येत असताना शेतकºयांना ताडपत्र्यांचे वाटप करण्यात आले नसल्याची बाब उघडकीस आली आहे.जिल्हा परिषदेने ताडपत्री खरेदी करीता सन २०१६-१७ ची अखर्चित तरतूद १५ लाख रुपये व सन २०१७-१८ मधील तरतूद १० लाख रुपये असे एकूण २५ लाख व शेतकºयांच्या हिस्सातील २५ लाख रुपये अशा एकूण ५० लाख रुपयांच्या ताडपत्री खरेदीला मंजूरी दिली. या मंजुरीला ३ महिन्यांपेक्षा अधिक कालावधी लोटला तरीही या योजनेचे लाभार्थी कोण हे अद्याप पुढे आले नाही. असा मुद्दा जि.प. सदस्य परशुरामकर यांनी उपस्थित केला आहे.जि.प. सर्वसाधारण सभा नुकतीच झाली. यात हा मुद्दा परशुरामकर यांनी लावून धरला. तेव्हा जिल्हा कृषी विभागाच्या अधिकाºयांना कुठलेच उत्तर देता आले नाही. जिल्ह्यातील सर्वच क्षेत्रात गंभीर दुष्काळ असल्याने मध्यम दुष्काळ हा शब्द वगळून पूर्ण जिल्ह्यात गंभीर दुष्काळ जाहीर करावा.जिल्हाधिकारी व कृषी अधीक्षक यांनी पाठविलेला अहवाल शासनाने मान्य करावा अशी मागणी जि.प. सदस्य परशुरामकर, रमेश अंबुले, सुरेश हर्षे, राजलक्ष्मी तुरकर, किशोर तरोणे यांनी चर्चेत भाग घेऊन केली. सभापती पी.जी.कटरे यांनी सुद्धा सदस्याच्या मागणीचे समर्थन करुन त्या आशयाचे ठराव पारीत करण्यात आला. ताडपत्रीच्या व शेतकºयांच्या मुद्यावर जि.प. कृषी अधिकारी वंदना शिंदे व कृषी अधीक्षक इंगळे हे सदस्यांचे समाधान करु शकले नाहीत. हंगाम संपत आला तरी शेतकºयांना ताडपत्र्यांचे वाटप झाले नाही. अर्जुनी मोरगावचे सभापती अरविंद शिवणकर यांनीही कृषी विभागाला खडेबोल सुनावले.१४१२ शेतकºयांचे अर्जगोंदिया जिल्ह्यातील आठही तालुक्यातील १ हजार ६६६ शेतकºयांना हंगामासाठी आयएसआय ट्रेडमार्कच्या ताडपंत्र्याचे शेतकºयांना वाटप करण्यात येणार आहे. आधी शेतकºयांना ताडपत्री खरेदी करायची असून खरेदीचे देयक जि.प.कृषी विभागाकडे सादर केल्यानंतर त्यांना दीड हजार रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. जिल्ह्यातील १६६६ शेतकºयांना ताडपत्री द्याची आहे. परंतु आतापर्यंत १४१२ शेतकºयांचे अर्ज आले आहेत. २५४ लाभार्थ्यांना आणखी ताडपत्रीसाठी लाभार्थी म्हणून घेता येईल असे कृषी विभागाचे म्हणणे आहे.