शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

हाजराफॉलला जाणाऱ्या विद्यार्थिनींच्या स्कूटीला अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2016 00:06 IST

गोंदियातील विवेक मंदिर स्कूलमधील सीबीएसई दहावीला शिकणाऱ्या विद्यार्थिनींची स्कूटर पानगाव वळणावर अनियंत्रित होऊन दगडावर आदळल्यामुळे दोघी जखमी झाल्या.

दोघी जखमी : पानगाव वळणावर दगडावर आदळली सालेकसा : गोंदियातील विवेक मंदिर स्कूलमधील सीबीएसई दहावीला शिकणाऱ्या विद्यार्थिनींची स्कूटर पानगाव वळणावर अनियंत्रित होऊन दगडावर आदळल्यामुळे दोघी जखमी झाल्या. त्यापैकी एक विद्यार्थिनी गंभीर जखमी झाली. श्रृतिका प्रमोद गुप्ता (१५) रा.अशोक कॉलनी गोंदिया असे गंभीर जखमीचे नाव असून दर्शिका हरिश पुजारा ही किरकोळ जखमी झाली आहे. प्राप्त माहितीनुसार, या दोघींसह आणखी दोन विद्यार्थिनी व चार विद्यार्थी असे आठ वर्गमित्र-मैत्रिणी हाजराफॉलचा धबधबा पाहण्यासाठी सकाळी चार गाड्यांनी निघाले होते. त्यापैकी श्रृतिका व दर्शिका या दोघी एका स्कुटीवर होत्या. सकाळी ९ वाजताच्या दरम्यान पानगाव-सालेकसादरम्यान तलावानजीक वळणाला स्कुटीवरील ताबा सुटला व अपघात घडला व रस्त्यालगतच्या दगडावर आदळून स्कुटीचे मधातून दोन तुकडे झाले. त्या विद्यार्थ्यांसाठी हा परिसर अनोळखी असल्याने ते कोणाला मदत मागण्यासाठी घाबरत होते. एवढ्यात दर्रेकसा येथील रहिवासी असलेले प्रा.मंगेश ठाकरे कॉलेजला जात असताना त्यांना हे दृश्य दिसले. त्यांनी जखमी श्रृतिकाला उचलून ग्रामीण रुग्णालय सालेकसा येथे नेले. तिथे प्राथमिक उपचार दिल्यानंतर १०८ क्रमांकावर अ‍ॅम्बुलेन्स बोलावून गोंदियाला रेफर करण्यात आले. त्यांच्यासोबत शुभांशू राकेश आंबेडकर, आकांक्षा राकेश चौरसिया व इतर चार असे एकूण आठ विद्यार्थी होते. आई-वडिलांना न सांगताच ते शाळेच्या गणवेशावर हाजराफॉलला जात होते. विशेष म्हणजे विवेक मंदिर स्कूल या शाळेत दहावीपर्यंत कोणत्याही विद्यार्थ्याला बाईक-स्कुटी अशा वाहनांनी येण्यास मनाई आहे. त्यामुळे हे विद्यार्थी शाळेत न येता परस्पर घरून तिकडे गेल्याचे बोलले जात आहे. (तालुका प्रतिनिधी)