शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
2
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
3
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
4
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
5
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
6
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
7
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
8
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
9
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
10
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
11
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
12
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
13
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
14
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
15
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
16
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
17
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
18
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
19
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
20
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे

शाळा झाल्या किचनशेडयुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 21:30 IST

विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन देण्यासाठी शालेय पोषण आहाराची सोय शासनाने केली. परंतु शालेय पोषण आहार बहुतांश शाळांमध्ये उघड्यावर शिजविला जत होता. यातूनच, प्रत्येक शाळेला किचनशेड असावे अशी संकल्पना पुढे आणून शाळांत किचनशेड तयार करण्यात आले.

ठळक मुद्देतीन शाळांमध्ये जागेचा अभाव : पोषण आहार उघड्यावर शिजविणे बंद

नरेश रहिले ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन देण्यासाठी शालेय पोषण आहाराची सोय शासनाने केली. परंतु शालेय पोषण आहार बहुतांश शाळांमध्ये उघड्यावर शिजविला जत होता. यातूनच, प्रत्येक शाळेला किचनशेड असावे अशी संकल्पना पुढे आणून शाळांत किचनशेड तयार करण्यात आले. यातील काही शाळांना फायब्रोकेटेड रेडीमेड किचनशेड उपलब्ध करून देण्यात आले. गोंदिया जिल्ह्यातील १०६५ पैकी १०६२ शाळांत किचनशेड असल्याची माहिती पुढे आली आहे.गोंदिया जिल्ह्यातील १०६५ शाळांत किचनशेड तयार करण्याची संकल्पना शिक्षण विभागाने आखली. परंतु किचनशेड करीता जिल्ह्यातील तीन शाळांमध्ये किचनशेड करीता जागा उपलब्ध नसल्यामुळे त्या ठिकाणी किचनशेड होऊ शकले नाही. जिल्ह्यातील १७३ शाळांमध्ये सिमेंट कॉँक्रीटचे किचनशेड आहेत. नवीन वस्ती शाळांत २०४ किचनशेड तयार करण्यात आले. तर ६८५ शाळांत फायब्रोकेटेड रेडीमेड किचनशेड देण्यात आले.अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ग्राम चिचोली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, गोंदिया तालुक्यात ग्राम रावणवाडी येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा व तिरोडा तालुक्यातील ग्राम बोरगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या तीन शाळांत किचनशेड करीता जागा उपलब्ध नसल्यामुळे किचनशेड तयार होऊ शकले नाही. एकंदरीत गोंदिया जिल्ह्यातील १०६५ पैकी १०६२ शाळांमध्ये किचन शेड उपलब्ध आहेत. अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील १३७ पैकी १३६ शाळांत किचनशेड आहे. आमगाव तालुक्यातील ११६ शाळांमध्ये, देवरी १४४, गोंदिया १८८ पैकी १८७ शाळांत, गोरेगाव १०९ शाळांत, सालेकसा ११७ शाळांत, सडक-अर्जुनी ११५ शाळांत तर तिरोडा तालुक्यातील १३९ पैकी १३८ शाळांत किचनशेड आहेत.