शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

सालेकसा व गोरेगाव तालुक्यात स्कूल बसेस बंदच

By admin | Updated: July 20, 2015 01:19 IST

मानव विकास कार्यक्रमांतर्गत शालेय विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करण्यासाठी स्कूल बसेस संबंधित आगारांना देण्यात आल्या. गोंदिया आगाराच्यावतीने सदर शाळा बसेस चार तालुक्यात धावतात.

आणखी मिळणार आठ बसेस : खंडविकास अधिकाऱ्यांनी पत्रच दिले नाहीगोंदिया : मानव विकास कार्यक्रमांतर्गत शालेय विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करण्यासाठी स्कूल बसेस संबंधित आगारांना देण्यात आल्या. गोंदिया आगाराच्यावतीने सदर शाळा बसेस चार तालुक्यात धावतात. मात्र शाळा सुरू होवून २० दिवसांचा कालावधी लोटूनही सालेकसा व गोरेगाव या दोन्ही तालुक्यांत अद्याप स्कूल बसेस सुरू करण्यात आल्या नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे.रा.प. महामंडळाच्या गोंदिया आगाराला गोंदिया, गोरेगाव, आमगाव व सालेकसा या चार तालुक्यांसाठी प्रत्येकी पाच याप्रमाणे एकूण २० स्कूल बसेस शासनाच्या मार्फत देण्यात आल्या आहेत. यावर्षी पुन्हा नवीन आठ स्कूल बसेस पुरविण्यात येतील, असे शासनाचे धोरण आहे. यापैकी दोन बसेस गोंदिया आगाराला प्राप्त झाल्या असून मानव विकास बसेसची संख्या आता २२ झाली आहे. तर पुन्हा सहा बसेस मिळणे बाकी असून त्या उपलब्ध झाल्यानंतर पुढील नियोजन ठरविण्यात येईल, असे आगार व्यवस्थापक गौतम शेंडे यांनी सांगितले आहे. सालेकसा व गोरेगाव तालुक्यात स्कूल बसेस सुरू करण्याबाबत आगार व्यवस्थापकांनी अनेकदा संबंधित तालुक्यातील खंडविकास अधिकाऱ्यांना पत्र पाठविले. मात्र तेथील खंड विकास अधिकाऱ्यांनी सालेकसा व गोरेगाव तालुक्यात स्कूल बसेस सुरू करण्याबाबतचे पत्र अद्यापही गोंदिया आगाराला पाठविले नाही. त्यामुळे सदर दोन्ही तालुक्यात शाळा सुरू होवूनही स्कूल बसेस सुरू होवू शकल्या नाही, असे आगार व्यवस्थापक गौतम शेंडे यांनी सांगितले. स्कूल बसेस सदर तालुक्यांमध्ये सध्या धावत नसल्यामुळे विद्यार्थ्यांची मोठीच फजिती होत आहे. गोंदिया आगाराच्यावतीने गोंदिया व आमगाव या तालुक्यातील खंडविकास अधिकाऱ्यांची स्कूल बसेस सुरू करण्याबाबतचे पत्र गोंदिया आगाराला मिळाल्याने सदर दोन तालुक्यांत स्कूल बसेस धावत आहेत. याचा लाभ विद्यार्थ्यांना मिळत आहे. मात्र शाळा सुरू होवूनही आपल्या तालुक्यात स्कूल बसेस सुरू करण्याचे भान सालेकसा व गोरेगाव येथील खंड विकास अधिकाऱ्यांना नाही काय? असा प्रश्न तेथील विद्यार्थ्यांचे पालक करीत आहेत. आता कधी या तालुक्यांना बसेस मिळतात याकडे त्यांनी लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)