शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

शाळेची घंटा वाजली; मुलांच्या आरोग्याची जबाबदारी घेणार कोण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 05:00 IST

जिल्ह्यातील इयत्ता ८ ते १२ वीच्या ४४ शाळा आतापर्यंत सुरू झाल्या नाही. ज्या शाळा सुरू झाल्या नाही त्या शाळांच्या हद्दीतील ग्रामपंचायतींनी ठराव दिलेला नाही. काही ग्रामपंचायत खासगी शाळांच्या संचालकांना शाळा सुरू करण्याचा ठराव देण्यासाठी पैशांची मागणी करीत असल्याच्या तक्रारी आता पुढे येऊ लागल्या आहेत. 

नरेश रहिलेलोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : ग्रामीण भागातील शाळा सुरू झाल्या असून, शहरी भागातील शाळा सुरू करण्याची लगबग सुरू आहे. वर्ग ८ ते १२ वी च्या शाळा सुरू झाल्या आहेत. जिल्ह्यात ३७९ शाळा असून, यापैकी ३३५ शाळा सुरू झाल्या आहेत. या शाळा सुरू करण्यासाठी ३३६ ग्रामपंचायत समितीने ठराव दिलेला आहे. ४३ शाळा सुरू करण्याचा प्रस्ताव देण्यात आला नाही. शाळा सुरू झाल्या तरीही काही शिक्षकांचे लसीकरण न झाल्याने कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो. यासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी लसीचे दोन्ही डोस घेणे आवश्यक आहे.  आतापर्यंत जिल्ह्यातील  प्राथमिक आणि माध्यमिक अशा दोन विभागांतील २३५ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण अद्याप झाले नाही. जिल्ह्यातील इयत्ता ८ ते १२ वीच्या ४४ शाळा आतापर्यंत सुरू झाल्या नाही. ज्या शाळा सुरू झाल्या नाही त्या शाळांच्या हद्दीतील ग्रामपंचायतींनी ठराव दिलेला नाही. काही ग्रामपंचायत खासगी शाळांच्या संचालकांना शाळा सुरू करण्याचा ठराव देण्यासाठी पैशांची मागणी करीत असल्याच्या तक्रारी आता पुढे येऊ लागल्या आहेत. 

जिल्ह्यात ३३५ शाळा सुरू- गोंदिया जिल्ह्यात वर्ग ८ ते १२वीच्या आश्रमशाळा व नगर परिषद क्षेत्रातील शाळा वगळून ३७९ शाळा आहेत.- ग्रामपंचायत समितीचा ठराव घेतलेल्या शाळांची संख्या ३३६ आहे. यापैकी ३३५ शाळा प्रत्यक्षात सुरू झाल्या आहेत.- माध्यमिक विभागाच्या ११५ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण अद्याप झालेले नाही. 

सॅनिटायझेशन करा, पैसे देणार कोण?- शाळा सुरू करण्यापूर्वी शाळेचे सॅनिटायझेशन करण्यात यावे अशा सूचना देण्यात येतात. परंतु, संपूर्ण शाळेचे सॅनिटायझेशन करण्यासाठी हजारो रुपये लागतील व हे पैसे कोण देणार? शाळेच्या सॅनिटायझेशनचा खर्च मुख्याध्यापक व शिक्षकांच्याच माथी मारला जात आहे.

तोंडी आदेशांमुळे मुख्याध्यापकांसमोर पेच- शाळा सुरू करण्यासाठी ग्रामपंचायत समितीचा ठराव लागतो. परंतु, ज्या ग्रामपंचायतींनी शाळा सुरू करण्याचा ठराव दिलेला नाही आणि शिक्षण विभाग शाळा सुरू करण्यावर जोर देत असेल तर या दोघांच्या मध्यात मुख्याध्यापक अडकत आहे. मुख्याध्यापकाने काय करावे हे त्यांना सूचत नाही. 

उपशिक्षणाधिकारी म्हणतातग्रामपंचायत समितीचा ठराव घेतल्यावर शाळेचे सॅनिटायझेशन करून शाळा सुरू करण्यात यावी अशा सूचना दिल्या आहेत. त्यापैकी ३३५ शाळा सुरू करण्यात आल्या, तर ठराव न मिळाल्यामुळे ४४ शाळा सुरू करण्यात आल्या नाही.           -प्रदीप समरीत, उपशिक्षणाधिकारी 

४४ शाळा बंदचइयत्ता ८ ते १२ वीच्या शाळा सुरू करण्याचे आदेश आहेत. त्त्यानुसार ग्रामीण भागातील ३३५ शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. अजूनही ४४ शाळा सुरू करण्यात आल्या नाही. त्यामुळे त्या शाळांत शिक्षण घेणारे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत आहेत.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSchoolशाळा