शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांअभावी शाळांच्या समायोजनेची पाळी

By admin | Updated: July 19, 2016 02:15 IST

नगर परिषदेच्या प्राथमिकच नाही तर माध्यमिक शाळांतही घसरण होत आहे. यात दोन प्राथमिक शाळांची अवस्था अत्यंत

कपिल केकत ल्ल गोंदियानगर परिषदेच्या प्राथमिकच नाही तर माध्यमिक शाळांतही घसरण होत आहे. यात दोन प्राथमिक शाळांची अवस्था अत्यंत लाजीरवाणी झाली आहे. बोटांवर मोजण्याइतकेच विद्यार्थी या दोन शाळांत अनेक वर्षांपासून आहेत. त्यामुळे नाईलाजास्तव नगर परिषद शिक्षण समितीने या दोन शाळांचे समायोजन करण्याचा ठराव घेतला आहे. समितीचा हा निर्णय त्यांच्यासाठी फायद्याचा असला तरीही नगर परिषदेसाठी अत्यंत दुर्भाग्यपूर्ण ठरणार आहे. मागील कित्येक वर्षांपासून नगर परिषदेच्या शाळांना विद्यार्थी पटसंख्या घसरणीचा आजार जडला आहे. कधी काळी विद्यार्थ्यांनी भरगच्च राहणाऱ्या एवढेच नव्हे तर बोर्डाचे टॉपर देणाऱ्या शाळा आता ओस पडल्या आहेत. परिणामी दरवर्षी झपाट्याने विद्यार्थी पटसंख्या खालावत चालली आहे. मोठ्या प्रमाणात उभ्या झालेल्या खाजगी शाळांची नजर नगर परिषदेच्या शाळांना लागली आहे. यामुळेच खाजगी शाळा जेथे विद्यार्थी सांभाळू शकत नाहीत. तेथे मात्र नगर परिषदेच्या शाळांना विद्यार्थ्यांची वाट बघावी लागत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. प्राथमिक व माध्यमिक दोन्ही शाळांची हीच गत आहे. यात मात्र प्राथमिक विभागातील दोन शाळा अत्यंत लाजीरवाण्या स्थितीत चालविल्या जात आहेत. यात सिव्हील लाईन्स मराठी शाळा व हिंदी टाऊन शाळा आहे. यातील सिव्हील लाईन्स मराठी शाळेत या सत्रात दोन विद्यार्थी असून हिंदी टाऊन शाळेत फक्त एकच विद्यार्थी आहे. त्यामुळे या तीन विद्यार्थ्यांसाठी नगर परिषदेला दोन शाळा चालवाव्या लागत आहेत. अगोदरच आर्थीक स्थिती कमकुवत असलेल्या नगर परिषदेला हा मात्र जबर भुर्दडच ठरत आहे. ही स्थिती बघता नगर परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने या दोन शाळांचे अन्य शाळांत समायोजन करण्याची मागणी केली.अस करायचेय समायोजन४यातील सिव्हील लाईन्स मराठी शाळेला इंजिनशेड शाळेत समायोजीत करण्याचा. तसेच हिंदी टाऊन शाळेला मालवीय शाळेत समायोजीत करण्याचा निर्णय शिक्षण विषय समितीने घेतला आहे. म्हणजे सिव्हील लाईन्स शाळेतील विद्यार्थी पुढे इंजिनशेड शाळेत पाठविले जाणार. तर हिंदी टाऊन शाळेतील विद्यार्थी मालवीय शाळेत पाठविले जाणार. या दोन्ही शाळा आजच्या शाळांपासून अंतरावर असल्याने भविष्यात या दोन्ही परिसरातील विद्यार्थ्यांसाठी नगर परिषदेची शाळाच उरणार नाही. अशात आर्थिकदृष्टया कमकुवत असलेल्या परिवारातील चिमुकल्यांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण होतो.