शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

बचत गटाच्या महिलांनी घेतला स्वच्छतेचा ध्यास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 01:08 IST

‘स्वच्छ मिशन, स्वच्छ भारत’ या संकल्पाने संपूर्ण भारतात स्वच्छता मोहीम राबविली जात आहे. सालेकसा तालुक्यातील कारुटोला येथील बचत गटाच्या महिलांनी हातात झाडू घेऊन स्वच्छता ....

लोकमत न्यूज नेटवर्कसाखरीटोला : ‘स्वच्छ मिशन, स्वच्छ भारत’ या संकल्पाने संपूर्ण भारतात स्वच्छता मोहीम राबविली जात आहे. सालेकसा तालुक्यातील कारुटोला येथील बचत गटाच्या महिलांनी हातात झाडू घेऊन स्वच्छता मोहीम राबविली व गावाला स्वच्छ करण्याचा ध्यास घेतला.महिला आर्थिक विकास महामंडळ गोंदिया, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत सखी लोक संचालित साधन केंद्र साखरीटोला तसेच संजीवनी ग्रामसंस्था कारुटोला यांच्या विद्यमाने वार्षिक सर्वसाधारण सभा व २ आॅक्टोबर महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त स्वच्छता अभियान कार्यक्रम घेण्यात आला होता.अध्यक्षस्थानी सरपंच राया फुन्ने होत्या. प्रमुख मार्गदर्शक म्हणून बॅरि. राजाभाऊ कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य तथा पत्रकार प्राचार्य सागर काटेखाये, प्रमुख अतिथी म्हणून उपसरपंच नंदकिशोर चुटे, अनिल गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य संतोष बोहरे, धनलाल कोरे, संयोगिनी उषा पटले, संजीवनी ग्रामसंस्थेच्या अध्यक्ष चारुमती बोहरे, उज्ज्वला नंदेश्वर, कुंदा टेंभरे, लता पटले, ललीता बोहरे, वनिता बोहरे, बबीता टेंभरे, छाया कटरे, सिंधू गजभिये, अंजूलता बोम्बार्डे उपस्थित होते.सर्वप्रथम महिलांनी गावातून प्रभात फेरी काढली. त्यासोबत महिलांनी हातात झाडू घेवून गावातील प्रत्येक गल्ली झाडून काढली व संपूर्ण गाव स्वच्छ केला. तसेच स्वच्छतेचे नारे लावण्यात आले. बचत गटाच्या महिलांनी स्वागत गीत सादर केले. त्या बरोबरच बचत गटाच्या प्रमुख महिलांनी बचत गटातील आर्थिक विकासाचा आढावा घेतला व बचत गटाच्या माध्यमातून महिलांचे होणारे स्वावलंबन व सक्षमीकरण याबद्दल विचार व्यक्त केले.कारुटोला येथे एकूण १७ बचत गट आहेत. या बचत गटांद्वारे विविध महिलांना आर्थिक पाठबळ मिळत असून घरकामाव्यतिरिक्त इतर कार्यात व व्यवसायात बºयाच महिला आघाडी घेत असल्याने कुटुंबाच्या विकासात महत्वाची भूमिका पार पाडत आहेत. महिलांचे ‘चूल व मूल’ हे कार्य कधीचेच मागे पडले असून विविध क्षेत्रात आपले कौशल्य दाखवित असल्याचे मत प्राचार्य काटेखाये यांनी व्यक्त केले.संचालन गीता गोंडाणे तर आभार छाया कटरे यांनी मानले. कार्यक्रमासाठी सावित्रीबाई फुले बचत गट, निर्मल, प्रज्ञा, लक्ष्मी, लोकसेवा, परिवर्तन, शारदा, विश्वास, संजीवनी, प्राजक्ता, महात्मा फुले, सकाळ, आराधना, दया, जिजामाता, दैनिक बचत गटाच्या महिला व इतर महिलांनी सहकार्य केले.