गोरेगाव : तालुक्यातील सटवा हे गाव आर.आर.(आबा) पाटील सुंदर गाव योजनेंतर्गत जिल्ह्यात सुंदर गाव ठरले असून या गावाने तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावून मानाचा तुरा रोवला आहे.आर. आर. पाटील सुंदर गाव योजनेंतर्गत मागील महिन्यात या गावची तपासणी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (स्वच्छता व पाणी पुरवठा) राजेश राठोड यांच्या समितीने केली होती. गावातील विकास कामे, शुद्ध वातावरण, स्वच्छता, गावकऱ्यांचा सामाजिक सलोखा आणि जिद्द पाहून ही समितीही खुश झाली होती. त्याचेच फलीत या गावाला मिळाले असून गावने तालुक्यात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. याबद्दल जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी प्रदीप कुमार डांगे आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) आर. एल. पुराम यांच्या हस्ते सरपंच विनोद पारधी आणि ग्रामसेवक एस. जे. पाटील यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानीत करण्यात आले. याप्रसंगी सरपंच पारधी आणि ग्रामसेवक पाटील यांनी,गावकऱ्यांचे सहकार्य आणि त्यांच्या अथक प्रयत्नाने हे यश संपादन करू शकलो असा ठाम विश्वास व्यक्त केला.
सटवा ग्रामपंचायत तालुक्यात प्रथम ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:26 IST