शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सटवा जि.प. शाळेच्या स्लॅबचे प्लास्टर कोसळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 20:49 IST

देवरी तालुक्यातील डवकी येथील जि.प.वरिष्ठ प्राथमिक शाळेची स्लॅब कोसळल्याची घटना ताजी असताना गुरूवारी (दि.२८) गोरेगाव तालुक्यातील सटवा येथील जि.प.वरिष्ठ प्राथमिक शाळेच्या स्लॅबचे प्लास्टर कोसळल्याची घटना सकाळी १०.४५ वाजताच्या सुमारास घडली.

ठळक मुद्देविद्यार्थी थोडक्यात बचावले : तीन दिवसात दुसरी घटना, शाळेच्या इमारती जीर्ण

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : देवरी तालुक्यातील डवकी येथील जि.प.वरिष्ठ प्राथमिक शाळेची स्लॅब कोसळल्याची घटना ताजी असताना गुरूवारी (दि.२८) गोरेगाव तालुक्यातील सटवा येथील जि.प.वरिष्ठ प्राथमिक शाळेच्या स्लॅबचे प्लास्टर कोसळल्याची घटना सकाळी १०.४५ वाजताच्या सुमारास घडली. सुदैवाने याच वेळेत विद्यार्थी जेवनासाठी वर्गखोली बाहेर गेले असल्याने मोठी जीवितहानी टळली. तीन दिवसात लागपोठ घडलेल्या दोन घटनांमुळे जि.प.शाळांच्या जीर्ण इमारतींचा प्रश्न पुन्हा समोर आला आहे.प्राप्त माहितीनुसार गोरेगाव तालुक्यातील सटवा येथे जि.प.वरिष्ठ प्राथमिक शाळा असून पहिली ते आठवीपर्यंत वर्ग असून एकूण १११ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. उन्हाळा असल्याने शाळा सकाळीत भरविल्या जात आहे. गुरूवारी (दि.२८) सकाळी १०.४५ वाजताच्या सुमारास विद्यार्थी जेवनासाठी शाळेच्या आवारात बसले होते.याच दरम्यान इयत्ता सातव्या वर्गाच्या खोलीच्या स्लॅबचे प्लास्टर कोसळून पडले. मोठा आवाज झाल्याने शिक्षकांनी वर्गखोलीत जावून पाहिले असता स्लॅबच्या प्लास्टरचा मोठा भाग पडलेला आढळला. त्यानंतर लगेच त्यांनी विद्यार्थ्यांना त्या वर्ग खोलीत न बसण्याची सूचना दिली. तसेच केंद्रप्रमुख व गोरेगाव पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी यांना याची माहिती दिली. दरम्यान या प्रकारामुळे विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.बांधकामावर प्रश्नचिन्हसटवा येथील जि.प.शाळेच्या इमारतीचे बांधकाम आठ ते दहा वर्षांपूर्वी करण्यात आले. मात्र अल्पावधीत स्लॅबचे प्लास्टर कोसळल्याने इमारत बांधकाम आणि त्यात वापरलेल्या साहित्यावर सुध्दा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.गुणवत्तेकडे दुर्लक्षइमारतींचे बांधकाम करताना जि.प.शिक्षण विभाग आणि बांधकाम विभागाचे सुध्दा लक्ष नाही. केवळ कंत्राट देऊन मोकळे होण्याच्या भूमिकेमुळे जि.प.शाळेच्या इमारत बांधकामाच्या दर्जाबाबत शंका व्यक्त केली जात आहे.शाळेच्या इमारतीची दुरूस्ती करण्याबाबत ग्रामपंचायतला आॅगस्ट महिन्यात पत्र दिले होते. मात्र अद्यापही दुरूस्ती करण्यात आली नाही. शाळेची इमारत जुनी नसून आठ ते दहा वर्षांपूर्वीच बांधण्यात आली आहे.- एन.सी.बिजेवार, मुख्याध्यापक, जि.प.शाळा सटवाशाळेच्या इमारतीचे बांधकाम आठ दहा वर्षांपूर्वीच करण्यात आले आहे. इमारत जीर्ण देखील झालेली नाही. अल्पावधीत स्लॅबचे प्लास्टर कोसळल्याने याची माहिती जि.प.शिक्षण विभागाला देण्यात येईल. तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने उपाय योजना करण्यात येईल.- चंद्रशेखर भगत, अध्यक्ष शालेय व्यवस्थापन समिती सटवा.

टॅग्स :zp schoolजिल्हा परिषद शाळा