शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

सरपंचाला जि.प. सदस्याची मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 00:07 IST

नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत मुंडीकोटा येथील सरपंचपदावर निवडून आलेले कमलेश आतीलकर यांना रेतीघाटाच्या वादावरुन एका जिल्हा परिषद सदस्यांनी मारहाण केल्याची घटना...

ऑनलाईन लोकमत तिरोडा : नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत मुंडीकोटा येथील सरपंचपदावर निवडून आलेले कमलेश आतीलकर यांना रेतीघाटाच्या वादावरुन एका जिल्हा परिषद सदस्यांनी मारहाण केल्याची घटना मंगळवारी (दि.२१) रोजी घडली. यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.आतीलकर हे मागील दोन वर्षापासून रेतीघाटावर कंत्राटदार अवैध पटेल यांच्याकडे दिवानजी म्हणून काम पाहतात. मंगळवारी (दि.२१) जि.प.सदस्य मनोज डोंगरे व कृष्णा भांडारकर यांनी घाटकुरोडा येथील रेतीघाटावर येवून त्यांना ५ लाख रुपयांची मागणी केली. मात्र ती पूर्ण न केल्यामुळे त्यांनी बुक्यांनी मारहाण केल्याचा आरोप सरपंच आतीलकर यांनी केला आहे. आतीलकर सध्या तिरोडा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत. आतिलकर यांनी दिलेल्या माहितीनुसार ते नियमितपणे कामावर गेले असता जि.प.सदस्य मनोज डोंगरे व कृष्णा भांडारकर यांनी रेतीघाट चालू ठेवायचा असेल तर ५ लाख रुपये दयावे लागतील असे सांगत ५ लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप आतीलकर यांनी केला. मात्र ते न दिल्याने बाचाबाची झाली यावरुन त्यांनी मारहाण केल्याचा आरोप केला आहे. त्याच दिवशी मुंडीकोटा येथे ग्रामपंचायतमध्ये सभा आयोजित करण्यात आली होती. पण कोरम अभावी स्थगीत करण्यात आली. तेवढ्यात छातीत दुखल्याने मला मुंडीकोटा प्राथमिक आरोग्य केंद्रात भरती करण्यात आले.मंगळवारी सायंकाळी ६ च्या सुमारास तिरोडा उपजिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आले. याची पोलिसात तक्रार केल्याचे आतीलकर यांनी प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत ११ पैकी भाजपाचे सात सदस्य व सरपंच निवडून आले.त्यात एका पक्षाला अपयश आले. त्यातूनच हा वाद झाल्याची चर्चा आहे. मात्र पोलिसांच्या चौकशीनंतर यातील खरे सत्य बाहेर येईल.पैशाच्या मागणीचा आरोप बिनबुडाचायासंदर्भात जि.प.सदस्य मनोज डोंगरे यांच्याशी संपर्क साधला असता या रेतीघाटावर अवैध रेतीचे उत्खनन होत आहे. याबाबत मला कार्यकर्त्यांचे फोन आले असता मी घाटकुरोडा रेती घाटावर चौकशीकरिता गेलो होतो. तिथे याबाबत विचारणा केली. वरिष्ठांसह मोबाईलवर बोलत असताना कृष्णा भांडारकर व इतर लोकात भांडण झाले. ५ लाख रुपयांची मागणी कुणीही कुठेही केली नाही. आतीलकर यांनी लावलले सर्व आरोप बिनबुडाचे आहेतत. त्यांनी ही मागणी सिद्ध करुन दाखवावी अन्यथा आपण अबू्र नुकसानीचा दावा ठोकणार असल्याचे सांगितले.