शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

वृक्षलागवडीसाठी सरसावली तरूणाई

By admin | Updated: September 2, 2016 01:54 IST

शहरातील काही विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन समाजासाठी आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी पुढाकार घेऊन ‘माझी भेट निसर्गासाठी’ या गटाची स्थापना केली.

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : पर्यावरण व स्वच्छतेसाठी गटाची निर्मिती गोंदिया : शहरातील काही विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन समाजासाठी आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी पुढाकार घेऊन ‘माझी भेट निसर्गासाठी’ या गटाची स्थापना केली. या गटातील काही सदस्यांनी जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांची नुकतीच भेट घेऊन गटामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांना पाठबळ देण्याची अपेक्षा जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनातून व्यक्त केली. गोंदिया शहरात मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरले असून त्याचा परिणाम शहरातील नागरिकांच्या आरोग्यावरही होत असल्याबाबत जिल्हाधिकऱ्यांचे लक्ष वेधले. विद्यार्थ्यांनी स्थापन केलेल्या या गटाने त्यांच्या कार्याची सुरूवात पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी वृक्षलागवडीपासून करण्याचे निश्चित केले. भविष्यात नदीची स्वच्छता करणे, पेपर, प्लास्टिक, ग्लास, पॉलीथीनचा पुनर्वापर याबाबत जनजागृती करणार असल्याचे सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून बदल करण्यासाठी आमचा गट काम करणार असून सोबत लोककल्याणाचे विविध उपक्रम राबविणार असल्याचे गटातील विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले. या गटातील जान्हवी गोयल, अमिशा रजनी, मुस्कार गुप्ता, मीरा जसानी, गुलनाझ शेख, रवी भगतानी, यश गोलानी, रितीका चचाणे, विशाल बजाज, अमीत मनकानी, रितीफ अग्रवाल, हर्ष नागदेवे, सुमीत बजाज यांचेसह तयार करण्यात आलेल्या गटातील अन्य विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.(शहर प्रतिनिधी)