अध्यक्षस्थानी संस्थापक जगदीश लोहिया होते. त्यांच्या हस्ते झोडे यांना संस्थेकडून भगवान गणपतीची मूर्ती, शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच विद्यालयाकडून संस्थापक जगदीश लोहिया, सदस्य पंकज लोहिया, प्राचार्य मधुसूदन अग्रवाल, मुख्याध्यापक मनोज शिंदे, राम झोडे यांच्या हस्ते भगवान राधाकृष्णाची मूर्ती, भेटवस्तू, शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. अनिल मेश्राम यांनीसुद्धा पुस्तक स्वरूपात भेट दिली.
यावेळी मधुसूदन दोनोडे, टी. बी. सातकर, डी.एस. टेंभुर्णे, आर.आर. मोहतुरे, यू.आर. बाच्छल, जी.एस. कावळे, पर्यवेक्षिका कल्पना काळे, मुख्याध्यापक मनोज शिंदे, प्राचार्य गुलाबचंद चिखलोंढे, प्राचार्य मधुसूदन अग्रवाल, अनिल मेश्राम, राम झोडे यांनी आपल्या भाषणातून संत तुकाराम बीज याविषयी माहिती दिली. कार्यक्रमाला डॉ. संकेत परशुरामकर, परेश लोहिया, थेर, अनिल दीक्षित, शमीम सय्यद, पठाण, प्रल्हाद कोरे, भजनदास बडोले, नलीराम चांदेवार, महादेव लाडे, कटनकर, प्रभू इटवले, दामोदर मेश्राम, पुरुषोत्तम लांजेवार, वसंता विठ्ठले, हरणे तसेच संस्थेशी संबंधित सर्व समित्यांचे पदाधिकारी, सदस्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. संचालन यू. बी. डोये यांनी केले. आभार डी.ए. दरवडे यांनी मानले.