शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

संस्काराचे मोती’ने ज्ञानात भर

By admin | Updated: January 13, 2016 02:32 IST

लोकमत वृत्तपत्र समुहाच्यावतीने आयोजित ‘संस्काराचे मोती’ ही स्पर्धा विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देते.

अजया कठाणे : श्री विद्या गर्ल्स हायस्कूलमध्ये पुरस्कारांचे वितरण साखरीटोला : लोकमत वृत्तपत्र समुहाच्यावतीने आयोजित ‘संस्काराचे मोती’ ही स्पर्धा विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देते. वृत्तपत्राच्या वाचनातून विद्यार्थ्यांचे सामान्य ज्ञान प्रगल्भ बनत जाऊन त्यांच्या ज्ञानाच्या कक्षा रूंदावतात. अलीकडच्या स्पर्धेच्या काळात विद्यार्थ्यांना ‘संस्काराचे मोती’ स्पर्धा उपयुक्त असल्याने हा एक स्तुत्य उपक्रम असल्याचे प्रतिपादन मुख्याध्यापिका अजया कठाणे यांनी केले. येथील श्री विद्या गर्ल्स हायस्कूलमध्ये आयोजीत ‘संस्काराचे मोती’ स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या.प्रमुख पाहुणे म्हणून लोकमतचे वार्ताहर सागर काटेखाये, पी.सी. बोपचे, एम.बी.पटले, के.पी. रहांगडाले, एम.के. कोरे,पी.बी. झा, कु.एन.एच. थदानी, एन.एस. काशिवार, डी.एस. बहेकार, कु.एस.एस. बडोले, कु.आर.एस. धोटे, कु.एस.के. रहांगडाले उपस्थित होते.सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी काटेखाये यांनी, ‘संस्काराचे मोती’ स्पर्धेविषयी माहिती देऊन लोकमतद्वारा विविध उपक्रम चालविले जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात वाढ होते असे मत व्यक्त केले. याप्रसंगी उपस्थित अन्य पाहुण्यांनीही आपले विचार व्यक्त केले. यावेळी प्रथम पुरस्कार तेजस्विनी बागडे, द्वितीय पुरस्कार मंगला भलावी तर तृतीय पुरस्कार माधुरी नेवारे हिला देण्यात आला. तसेच प्रोत्साहन पुरस्कार बहाल करण्यात आले. संचालन टी.जी. फुंडे यांनी केले. आभार शिक्षिका थदानी यांनी मानले. कार्यक्रमासाठी ए.डी. आईन्द्रेवार, एच.सी. वाघमारे, डी.ए. चिंधालोरे, ए.एन. वर्गन्टवार यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)